शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

"कारागिरांना त्यांच्या कलाकृतीची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध"; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:19 IST

छत्तीसगड सरकार हस्तकलाकारांच्या कला आणि श्रमाला योग्य न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी म्हटलं.

CM Vishnu Dev Sai: छत्तीसगडमध्ये हस्तकला विकासाच्या अपार शक्यता असून इथल्या कलाकृतींना परदेशातही मागणी आहे, त्यामुळे छत्तीसगडच्या हस्तकला उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि कारागिरांना त्यांच्या कौशल्याची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी म्हटलं. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी मंगळवारी रायपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात छत्तीसगड हस्तकला विकास मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती शालिनी राजपूत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्र्यांनी साधन उपकरण योजनेअंतर्गत हस्तकलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री साय यांनी सांगितले.

पदभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री साय यांनी छत्तीसगड हस्तकला विकास मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षा श्रीमती शालिनी राजपूत यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. शालिनी राजपूत यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगड हस्तकला विकास मंडळ कारागिरांच्या उन्नतीसाठी काम करेल, असं मुख्यमंत्री विष्णू देव साय म्हणाले. 

"छत्तीसगडच्या प्रत्येक क्षेत्रात कारागीर खूप चांगल्या प्रकार काम करतात. सुशासन तिहार दरम्यान, मला कोंडागाव येथील शिल्पग्रामला भेट देण्याची संधी मिळाली. तिथल्या कारागिरांना मी भेटलो आणि त्यांची कला जवळून पाहण्याची संधी मिळाली. रायगडच्या एकतालमधील कारागीर धातूपासून विविध कलाकृती बनवतात. बस्तरमध्ये, लाकडापासून सुंदर लाकडी वस्तू बनवल्या जातात. आपल्या संपूर्ण राज्यातील हस्तकलाकारांकडे असलेले हे कौशल्य आश्चर्यकारक आहे.  मला दिलेली सुंदर टोपी छिंद आणि कांस्यापासून बनवली आहे. जशपूरमधील आमच्या गावाजवळील कोटम्पानीमध्ये, छिंद आणि कांस्यापासून खूप सुंदर कलाकृती देखील बनवल्या जातात," असं मुख्यमंत्री विष्णू देव साय म्हणाले.

"आपल्या इथल्या कारागिरांना आणखी चांगले आणि जास्तीत जास्त प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हस्तकला काम हे ग्रामीण भागातच जास्त प्रमाणात केले जाणे अत्यंत महत्वाचे आहे. हस्तकला विकासाच्या माध्यमातून आपण गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्याच दृष्टीने हस्तकला विकास मंडळ काम करेल आणि प्रशिक्षणाबरोबरच कारागिरांना जास्तीत जास्त कर्ज-अनुदार देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल अशी आशा आहे," असंही मुख्यमंत्री साय म्हणाले.

"आपल्या राज्यातील कोंडागावच्या डोकरा कलाकृतीला परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे त्या कारागिरांना त्यांनी तयार केलेल्या वस्तूंसाठी बाजारपेठेसोबतच योग्य किंमत मिळणे महत्त्वाचे आहे. या हस्तकलाकारांना बाजारपेठेत थेट प्रवेश मिळाला पाहिजे जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल. छत्तीसगडमधील गढबंगाल येथील पंडी राम मांझी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हीसुद्धा खूप आनंदाची बाब आहे. छत्तीसगडची कला ही आपल्या देशाची शान आहे, तिला जगभरात मान्यता मिळाली पाहिजे," असं मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड