शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उमरगा पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी जेरबंद

By admin | Updated: January 6, 2017 23:58 IST

उमरगा : उमरगा पालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले़

उमरगा : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करून घेऊन पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी तीन हजार रूपये घेताना उमरगा पालिकेचे सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जेरबंद केले़ ही करवाई शुक्रवारी उमरगा येथे करण्यात आली असून, या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा शहरातील तक्रारदार यांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून १६ जुलै रोजी नगर परिषदेतील आवक-जावक विभागात अर्ज दिला होता़ त्यानंतर तक्रारदारांनी पालिकेतील सहायक प्रकल्प अधिकारी मारूती एकनाथ भादुले यांना याबाबत विचारणा केली होती़ त्यावेळी मारूती भादुले यांनी घरकुल मंजूर करून देण्यासाठी व पहिल्या हप्त्याचा चेक देण्यासाठी तीन हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली होती़तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीचे अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे, पोलीस उपअधीक्षक गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि आसिफ शेख, पोनि बाळासाहेब आघाव, पोना पांडुरंग उंबरे, बालाजी तोडकर, नितीन सुरवसे, पोकॉ राहुल नाईकवाडी, चालक धनंजय म्हेत्रे यांच्या पथकाने उमरगा पालिकेत सापळा रचून लाचेची पडताळणी केली होती़ त्यानंतर शुक्रवारी सकाळी पालिकेत सापळा रचण्यात आला़ त्यावेळी तक्ररदाराच्या कामासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी मारूती भादुले यांनी तीन हजार रूपये लाचेची मागणी करून ते स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या कारवाईमुळे पालिकेतील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत़