जालना : जिल्हा परिषदेचा ४८ कोटी गोंधळात अर्थसंकल्प मंजूर ६९ लाख ८५ हजार २३७ रूपयांचा आर्थिक संकल्प गोंधळातच मंजूर करण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या अर्थसंकल्पाला कडाडून विरोध केला. सर्कलमध्ये विकास कामांसाठी ३५ लाख रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात न आल्याने सत्ताधारी आणि विरोधक सदस्यांनी तब्बल साडेसात तास आक्रमक भूमिका घेतली. कोणत्याही हेडमधून पैसे काढा पण आम्हाला ३५ लाख रूपये द्याच, या मागणीसाठी काही सदस्यांनी सभागृहात अर्थसंकल्पाची प्रत भिरवकाली. अखेर बांधकाम विभागातून १३ लाख आणि सिंचनाच्या हेडमूधन १० असे २३ लाख रूपयाचां निधी देण्याचे मंजूर करण्यात आल्यानंतर सभागृह शांत झाले.जिल्हा चार वर्षांपासून दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात आहे. जि. प. उपाध्यक्ष तथा वित्त सभापती अनिरुद्ध खोतकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनासाठी निधीची तरतूद नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत गरीबांची मुले शिकतात. त्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी हा उपक्रम सुरू होता. मात्र, या मुलांना हे शिक्षण मिळू नये यासाठी तरतूद करण्यात आली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. बागायतदार शेतकऱ्यांनाच फायदा होइल अशी तरतुदी आहे. लहान शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नसल्याची टीकाही सदस्यांनी केली. मालमत्ता सर्व्हेशन केलेली २५ लाख रूपये ठेवण्यावर आक्षेप घेण्यात आला. हे काम त्या त्या परिसरातील कनिष्ठ अभियत्यांकडे देण्यात आल्यास जि. प खर्च वाचू शकतो, असे सदस्य सूचिवले. या अर्थसंकल्पात अनेक नवीन हेड निर्माण करण्यात आले. परंतु ते आम्हाला समजावून सांगावे अशी मागणी सदस्यांनी केली. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था असून, त्याकडे दुर्लक्ष करून २० लाख रूपये आयुर्वेदिक आणि युनानी दवाखाने आणि औषधीवर खर्च करण्याची गरजच काय. पहिल्यांदा आपले आरोग्य केंद्र चांंगले करा आणि आरोग्याची सुविधा चांगली देण्याची मागणी सदस्यांनी केली. साथरोगावर उपाययोजनेसाठी आरोग्य केंद्रातील बंद पडलेल्या फॉगींग मशिन सुरू कराव्यात आणि नव्याने फॉगींग मशिनसाठी तरतूद वाढवावी, अशी मागणीही सदस्यांनी सभागृहात केली. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प गोंधळात मंजूर
By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST