शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, वकील संघ उपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:43 IST

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद, जिल्हा वकील संघ व बजाज आॅटो संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सचिन लव्हेरा, मोहित घाणेकर व सागर तळेकर हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देसचिन लव्हेरा, मोहित घाणेकर, सागर तळेकर सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह टी-२० क्रिकेट स्पर्धेत जिल्हा परिषद, जिल्हा वकील संघ व बजाज आॅटो संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सचिन लव्हेरा, मोहित घाणेकर व सागर तळेकर हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या बाद फेरीत जिल्हा वकील संघाविरुद्ध एआयटीजीने ७ बाद ११२ धावा केल्या. त्यांच्याकडून संकेत पाटीलने २८, अक्षय अकूडने २७ धावा केल्या. वकील संघाकडून रामेश्वर मतसागरने ३, तर मोहित घाणेकर व दिनकर काळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा वकील अ संघाने विजयी लक्ष्य १६ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मोहित घाणेकरने ८ चौकारांसह ५६ धावा केल्या. संतोष भारतीने ३ षटकार व ४ चौकारांसह ४४ धावा केल्या. एआयटीजीकडून रणजित पारडकरने २३ धावांत ४ गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात जॉन्सन संघाने २० षटकांत १५१ धावा केल्या. नीरज शिमरेने २ षटकार व ४ चौकारांसह ४६, प्रवीण क्षीरसागरने २ षटकार व ४ चौकारांसह ३२ धावा केल्या. जिल्हा परिषदेकडून सय्यद आरीफने ३ व भाऊसाहेब गर्जेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जिल्हा परिषदने विजयी लक्ष्य १४ षटकांत ३ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ४१ चेंडूंत ७ टोलेजंग षटकार व ७ खणखणीत चौकारांसह ८७ धावांची विजयी खेळी केली. त्याला विजय अडलाकोंडा याने २१ चेंडूंत ४ चौकारांसह २९ धावा करीत सुरेख साथ दिली. जॉन्सनतर्फे अनिरुद्ध पुजारी व एकनाथ बांगर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तिसºया सामन्यात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्चरने १९ षटकांत १२२ धावा केल्या. त्यांच्याकडून गणेश गोरक्षकने ३५ व अरुण दाणीने २५ धावा केल्या. बजाज आॅटोकडून महेश पाडळकरने १३ धावांत ४ व सागर तळेकरने ३ व राजा चांदेकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात बजाजने विजयी लक्ष्य २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून कर्णधार सागर तळेकरने ७ चौकार व एका षटकारासह ६८, प्रथमेश शिरोडकरने ४ चौकारांसह ३४ व महेश पाडळकरने १७ धावांचे योगदान दिले. यश चव्हाण व सुनील भाले यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.