परंडा : स्वत:च्या विहिरीतील पाणीपातळी पाहताना तोल जावून आतमध्ये पडल्याने गंभीर दुखापत झालेल्या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास देवगाव (ता़परंडा) शिवारात घडली़ देवगाव येथील सचिन नागनाथ चौधरी हा युवक रविवारी रात्री शेतात गेला होता़ शेतातील विहिरीतील पाणी आहे की संपले हे पाहण्यासाठी आतमध्ये डोकावत असताना त्याचा तोल जावून तो विहिरीतील दगडावर पडला़ यात गंभीर जखमी झाल्याने त्याला परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले़ याबाबत परंडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू
By admin | Updated: September 29, 2015 00:43 IST