शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

उतारवयातही कायम तरुणाईचा जोश !

By admin | Updated: September 26, 2014 01:54 IST

बीड: ‘अजिब दासताँ है ये’ या फिल्मी गीतावर आजोबा - आजीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मावळतीकडे झुकलेले अनेक जोडपे थिरकत होते.

बीड: ‘अजिब दासताँ है ये’ या फिल्मी गीतावर आजोबा - आजीसाठी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मावळतीकडे झुकलेले अनेक जोडपे थिरकत होते. हा करीष्मा मंगळवारी नाट्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिसून आला. नाट्य परिषदेच्या बीड शाखेतर्फे हिट फिल्मी गाणी, बहारदार नृत्य, लग्नाच्या गोष्टी, भारूड, भावगीत आणि सोबतच फॅन्सी ड्रेस स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साठीकडे झुकलेली तरूणाई सुमारे तीन ते साडेतीन तास विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जल्लोषात आपले वय विसरून गेली होती. यावेळी ‘माझ्या लग्नाची गोष्ट’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करीत साठीच्या पुढील जोडपी आपल्या तारूण्यात केंव्हा गेली कळालीच नाही. अ‍ॅड. कालिदास थिगळे, सत्यनारायण लाहोटी, डॉ. विश्वास जोशी आणि जनार्दन दोडके या जोड्यांनी आपले अनुभव सांगितले. विविध कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमात या कलावंतांनी आपल्या अभिनयाचा कसच दाखविला. विठ्ठलराव राजहंस यांचा जोकर असो की ‘ना हिंदु बनेगा ना मुसलमान बनेगा’ हा सामाजिक स्पर्श करणारा भाव व्यक्त करणारे डॉ. विजय क्षीरसागर असोत. गायन कलेतील सगळेच प्रकार उकलत उकलत तीन- साडेतीन तास कसे गेले कळालेच नाहीत. नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी ‘अजिब दासताँ है ए’ हे गीत सादर करून आपले वेगळेपण दाखविले. या कार्यक्रमात शालिनी कुलकर्णी, कमल देशमुख, आरोळे, सुधाकर धसे, वर्षा जोशी, प्रा. अनिता शिंदे, प्रज्ञा देशपांडे, लिला मानुरकर, क्षमा देवगावकर, स्वयंप्रकाश खडके, पुरूषोत्तम देवगावकर, उदय व उमा कसरेकर, किशोरसिंह बुंदेले, डी.एस. कुलकर्णी, भरत लोळगे, प्रभाकर कुलकर्णी, बाळकृष्ण बडवे, गणपत देशमुख, सुमती पिंगळे, माया व संजय खांदाट, संगीता व सुधाकर रामदासी आदींचे अभिनय प्रेक्षकांना भावून गेले. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला. काश्मिरमधील पुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्तीतील आपत् ग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. डॉ. दीपा क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ रंगकर्मी कुलदीप धुमाळे यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकारला. या कार्यक्रमात प्रा. दुष्यंता रामटेके, मधुकर वडमारे, डॉ. विद्यासागर पाटांगणकर, डॉ. सतीश साळुंके, डॉ. संजय पाटील देवळाणकर, डॉ. सुरेखा जोशी, प्रा. दिपक जमदाडे, प्रा. सुरेश थोरात, प्रा. लक्ष्मीकांत दोडके, मिलिंद शिवणीकर आणि शेख यांचा संयोजनात सहभाग होता.(प्रतिनिधी)