शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘तुमचे आयुष्य कधीही बदलू शकते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:57 IST

आपले आयुष्य कधीही बदलू शकते यावर माझा विश्वास आहे, असे प्रांजळ मत भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खेळाप्रती असलेली माझी श्रद्धा, समर्पण, अपार मेहनत करण्याची जिद्द आणि देशावरील निस्सीम प्रेम या चतु:सूत्रीच्या बळावरच मी यशस्वी झालो आहे. मी कधीच विचार केला नव्हता की, मी देशासाठी हॉकी खेळेन, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारेन. आपले आयुष्य कधीही बदलू शकते यावर माझा विश्वास आहे, असे प्रांजळ मत भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी व्यक्त केले.उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकरलिखित ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते रविवारी (दि.१५) तापडिया नाट्यमंदिरात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक ऋषिकुमार बागला, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, बाबा भांड आणि अंजली धानोरकर यांची उपस्थिती होती.क्रीडा, उद्योग अशा सर्वच क्षेत्रांत सॉफ्ट स्किल्सची गरज असते. येथून पुढे तर कौशल्य अवगत केल्यावाचून पर्याय नाही. यशस्वी खेळाडू होण्याकरिता ही सॉफ्ट स्किल्स माझ्या उपयोगी आली, असे पिल्ले म्हणाले.धानोरकर यांनी पुस्तक लिखाणामागची भूमिका व निर्मितीप्रक्रिया याविषयी वर्णन केले. ‘आयुष्यात येणाºया प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सॉफ्ट स्किल्स फार कामी येतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून अधिकाºयांपर्यंत कोणीच अपवाद नाही. यशामध्ये १५ टक्के हार्ड स्किल्स आणि ८५ सॉफ्ट स्किल्सचा वाटा असतो.देशमुख यांनी त्यांचा वाचन प्रवास उलगडताना सांगितले की, ‘वाचनातून चांगला लेखक होता येते. बालपणी वाचलेले साहित्य मनावर संस्कार रुजवतात. वाचल्यामुळे नवे जग कळते, अनुभवविश्व विस्तारते. मला वाचनाने काय दिले, तर मला समृद्ध केले असेच मी म्हणेन.’बागला यांनी रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी सॉफ्ट स्किल्स अत्यावश्यक असल्याचे सांगितले. ‘कौशल्य अवगत करण्याची सुरुवात आईच्या पोटात असल्यापासूनच होते. कौशल्यविकासाच्या पुस्तकांतून एक दिशा मिळते. ते कौशल्य अंगीकारणे महत्त्वाचे,’ असे ते म्हणाले.कार्यक्रमात अंजली धानोरकर यांनी अभिवाचन केलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकाच्या दृक्श्राव्य डीव्हीडीचेही विमोचन करण्यात आले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संगीता दाभाडे यांनी आभार मानले.