औरंगाबाद : एमजीएम स्पोर्ट क्लब मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम करंडक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ संघाने मुंबई येथील फ्युचर क्रिकेट क्लबवर मात केली. दुसºया सामन्यात महावितरण संघाने नेरळकर संघावर विजय मिळवला. प्रदीप जगदाळे व आजम खान हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात यंग इलेव्हन अ संघाने २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रदीप जगदाळेने ३ चौकारांसह १८, स्वप्नील चव्हाणने ३ चौकारांसह १३, राहुल शर्माने १५ व अब्दुल वहीदने १५ धावा केल्या. मुंबईच्या फ्युचर स्टार क्लबकडून वसीम शेखने १६ धावांत ३ व प्रमोद वाघ व गलीमन शेख यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फ्युचर स्टार क्लब ९२ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून शोएब सिद्दीकीने २५, प्रमोद वाघने २४ व नीरज पटवारीने १७ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून प्रदीप जगदाळे, अब्दुल वहीद व संदीप सहानी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.दुपारच्या सत्रात महावितरण संघाविरुद्ध नेरळकर संघाने २० षटकांत ८ बाद ८१ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रथमेश शिरोडकरने १७, कृष्णा पवारने १३ व आदित्य नाईकने नाबाद १२ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अली सय्यद, शेख साहील व पवन सूर्यवंशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरणने विजयी लक्ष्य १४.४ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून हरमितसिंग रागीने १९ व व्यंकटेश सोनवलकरने नाबाद १५ धावा केल्या. निशीत कंडी ११ धावांवर बाद झाला. नेरळकर क्रिकेट संघाकडून आजम खानने २५ धावांत ३ व आदित्य नाईकने २ गडी बाद केले. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून उदय बक्षी, राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, आर. नेहरी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अनंत बकाल यांनी केले. १ डिसेंबर रोजी इकबाल फॅन क्लब विरुद्ध यंग इलेव्हन ब आणि दुपारी १२.३० वाजता श्रेयस क्रिकेट क्लब वि. यंग इलेव्हन अ यांच्यात सामने होणार आहेत.
यंग इलेव्हनचा मुंबईच्या संघावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:38 IST