शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपुरा येथे मध्यरात्री तरुणाचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील पिया मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास ...

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती असलेल्या औरंगपुरा परिसरातील पिया मार्केटमध्ये किरकोळ कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मध्यरात्री ११.३० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, रात्री उशिरापर्यंत पोलीस यंत्रणा आरोपींचा शोध घेत होती.

समीर खान सिकंदर खान (२७, रा. असेफिया कॉलनी), असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, असेफिया कॉलनी येथील समीरचा गांजा विकण्याचा पिढीजात धंदा आहे. गुरुवारी मध्यरात्री समीर आपला मित्र आदिलसोबत पिया मार्केट येथील ओम साई लीला या बीअर बारमधून पार्सल आणण्यासाठी गेला होता. पार्सल घेऊन परत निघत असताना बारसमोरील वडाच्या झाडाजवळ त्याची तीन तरुणांसोबत किरकोळ बाचाबाची झाली. समीरचा मित्र यावेळी मदतीला धावून आला. त्याने दोघांना मारहाण केली. एका तरुणाने समीरच्या मांडीत धारदार शस्त्राने घाव केले. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. गुप्तांगाजवळ खोलपर्यंत जखम झाल्याने समीर कोसळला. प्रचंड रक्तस्राव सुरू होता. मोमीन खान आमीर खान, समीर खान बाबर खान या दोघांनी त्याला त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी समीरला तपासून मृत घोषित केले. समीरचा खून झाल्याची वार्ता मध्यरात्री शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याची संपूर्ण यंत्रणा दाखल झाली. रात्री उशिरा सिटीचौक पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती.

‘ते’ तीन आरोपी कोण?

समीरची हत्या करणारे तीन आरोपी कोण, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. भांडण जेव्हा झाले तेव्हा त्याच्यासोबत असलेला आदिल याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मारेकरी कोण होते, याचा शोध रात्री १ वाजेपर्यंत तरी पोलिसांना लागलेला नव्हता. समीरच्या वसाहतीत तणावपूर्ण शांतता होती. रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल होत होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही याचवेळी सुरू होती.