शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या लिव्हर शस्त्रक्रियेच्या मदतीसाठी तरूण चढला टॉवरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 19:32 IST

सहा महिन्यापासून शासनाकडून त्यांना मदत मिळाली नाही.

ठळक मुद्देदहा जणांनी दिली रोख २ लाख ३१ हजार रुपयेखा. इम्तियाज जलील यांच्या आश्वासनानंतर  दोन तासानंतर खाली उतरला.

औरंगाबाद: वडिलांच्या लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्यासाठी टी.व्ही.सेंटर येथील दुरदर्शनच्या टॉवरवर चढलेल्या तरूण खा. इम्तियाज जलील यांच्या आश्वासनानंतर  दोन तासानंतर खाली उतरला. यावेळी उपस्थितांनी त्याला तातडीने २ लाख ३१ हजाराची रोख मदत केली.

मंगेश संजय साबळे (वय २३,रा.गेवराई पायगा, ता.फुलंब्री)असे या तरूणाचे नाव आहे. वडिलांच्या लिवर प्रत्यारोपण  शस्त्रक्रियेसाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्चही डॉक्टरांनी सांगितला. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मंगेश हे एवढी रक्कम जमा करू शकत नाही. यामुळे त्यांनी पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून वडिलांच्या शस्त्रक्रियेकरीता पैसे मिळावे, यासाठी अर्ज केला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन शासनाकडून तातडीने निधी मिळवून द्यावा,अशी विनंती केली. मात्र सहा महिन्यापासून शासनाकडून त्यांना मदत मिळाली नाही. परिणामी वडिलांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक नाजूक होत आहे.

यामुळे त्यांनी १३ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी त्यांची दखल घेतली नाही. यामुळे संतप्त मंगेश बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास टी.व्ही.सेंटर येथील दूरदर्शनच्या टॉवरवर चढून त्याने आत्महत्या करणार असल्याची पत्रके फेकली. याबाबत माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली. लोकांनी आवाहन करूनही तो उतरत नव्हता. खा. इम्तियाज जलील यांनी त्याला पूर्ण मदतीचे आश्वासन देत खाली येण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत मंगेश तब्बल दोन तासानंतर खाली उतरला. यानंतर सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी त्याची समजूत काढली.

दहा जणांनी दिली रोख २ लाख ३१ हजार रुपयेमंगेशची अवस्था पाहून अभिजीत देशमुख यांनी एक लाख, बाळासाहेब थोरात  ५१ हजार रुपये, सुदाम सोनवणे  २५ हजार , अनिल बोरसे २५ हजार, बाळासाहेब औताडे   ११ हजार, संदीप फासगे ११ हजार आणि  सुधाकर शिंदे , गणपत खरात , कैलास मुगले , नितेश साळवे यांनी प्रत्येकी एक हजार असे एकूण २ लाख ३१ हजार रुपये मदत दिली.

आरोग्यमंत्र्यांकडून उपचाराची व्यवस्था घटनेची माहिती मिळताच आरोग्यमंत्री एकनाथ शिदे यांनी तात्काळ वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांना रुग्णाच्या उपचारासाठी सूचना केल्या. यानंतर चिवटे यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून गुरुवारी(दि,19) रुग्णास दाखल करून घेऊन तत्काळ उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली.