शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेत चिमुरडीसह जवान ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:43 IST

आजीसासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जाणा-या भारत बटालियनच्या जवानासह त्याच्या मेहुणीच्या १३ महिन्यांच्या चिमुकलीला भरधाव टँकरने चिरडले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आजीसासूच्या राख सावडण्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जाणाºया भारत बटालियनच्या जवानासह त्याच्या मेहुणीच्या १३ महिन्यांच्या चिमुकलीला भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार महिला किरकोळ जखमी झाली. हा भीषण अपघात १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केंब्रिज शाळेच्या चौकात झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी टँकरचालकास अटक केली.भारत बटालियनचा जवान किशोर दादासाहेब थोटे (२७, ह.मु. भारत बटालियन, सातारा परिसर, मूळ रा.थेरगाव, ता. पैठण), गायत्री राजू दहीहंडे (१३ महिने, रा.चिकलठाणा)असे ठार झालेल्यांची नावे आहेत. रोहिणी दहीहंडे (२५, रा.चिकलठाणा) या घटनेत जखमी झाल्या.याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, किशोर थोटे यांच्या आजीसासूचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची राख सावडण्याचा कार्यक्रम दि.१ रोजी सकाळी आडगाव ठोंबरे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी किशोर, त्यांची मेहुणी रोहिणी दहीहंडे आणि चिमुकली गायत्री हे मोटारसायकलने (एमएच-२० बीडब्ल्यू ७१२८) आडगाव ठोंबरे येथे सकाळी चिकलठाणा येथून निघाले. केंब्रिज चौकात ते असतानाच झाल्टा फाट्याकडून सुसाट आलेल्या पेट्रोलच्या टँकरने (एमएच-०४बीयू७०२१) दुचाकीला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालक (पान ५ वर)टँकरचालकास अटकया अपघातानंतर पोलिसांनी टँकरचालक नीलेश साहेबराव वडगर (३२, रा. नांदूर, जि. नाशिक) याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. तो मनमाड येथून पेट्रोल-डिझेलचे टँकर घेऊन हिंगोली जिल्ह्यातील हत्ता येथे जात होता.अपघाताचा चौककेंब्रिज शाळा चौकाजवळ सतत लहान-मोठे अपघात घडतात. झाल्टा फाट्याकडून येणारी वाहने रेल्वे ओव्हर ब्रीजवरून उतारामुळे वेगात येतात. उतारावरून येणारी वाहने सुसाट जालना रोडवरील केंब्रिज शाळा चौकात येतात. त्याचवेळी जालन्याकडून औरंगाबादकडे आणि औरंगाबादकडून जालन्याकडे किंवा झाल्टा फाटा, हर्सूल रिंग रोडकडे वळण घेणाºया वाहनांची संख्या अधिक असते. कोणते वाहन कोणत्या दिशेने वळण घेते हे झाल्टा फाट्याकडून येणाºया वाहनचालकाच्या लवकर लक्षात येत नाही आणि तिकडून येणाºया वाहनांमुळे अपघात घडतात. या चौकाजवळ चार महिन्यांपूर्वी एका सुसाट जीपचालकाने चार पादचाºयांना चिरडले होते. त्या वाहनाचा चालक अद्यापही मोकाट आहे.शोकसलामी देऊन अंत्यसंस्कारकिशोर थोटे हे २०१४ साली भारत बटालियनमध्ये भरती झाले. वर्षभर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांचे लग्न झाले. त्यांना सव्वा वर्षाची मुलगी आहे. या घटनेची माहिती मिळताच भारत बटालियनचे उपाधीक्षक बी.एस. पवार, निरीक्षक आर.ए. राऊत, अशोक साळवे आणि अन्य जवानांनी, तसेच त्यांच्या गावाकडील नातेवाईकांनी घाटीत धाव घेतली.४अत्यंत मनमिळावू स्वभावाचा हा जवान होता, अशी माहिती त्यांच्या सहका-यांनी दिली. नातेवाईकाच्या राख सावडण्यासाठी जायचे असल्याने किशोर यांनी एक दिवसाची किरकोळ रजा घेतली होती.४घाटीत त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत भारत बटालियन येथे नेण्यात आले. तेथे त्यांना शोक सलामी देण्यात आली. यानंतर शासकीय इतमामात थेरगाव या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.