शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औषधांची सोय तुम्हीच लावा बुवा...; सरकारी रुग्णालयांना ‘उसनवारी’चा आजार, ‘घाटी’तील रुग्ण बाहेरून आणतात औषधे

By संतोष हिरेमठ | Updated: August 3, 2023 10:46 IST

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाकडे आजघडीला शंभराहून अधिक औषधींचा ठणठणाट आहे. 

छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडील औषधे संपल्याने रुग्णालयांना इतर शासकीय रुग्णालयाकडून औषधे उसने घेऊन रुग्णांना पुरवावी लागतात. अनेकदा आवश्यक औषधे नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे विकत घेऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. राज्यातील काही रुग्णालयांमध्ये अनेकदा अशी परिस्थिती उद्भवत असल्याने त्याचा रुग्ण आणि  नातेवाइकांना फटका बसत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाकडे आजघडीला शंभराहून अधिक औषधींचा ठणठणाट आहे. 

मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांसाठी आधार असलेल्या घाटी रुग्णालयावर रुग्णसेवेचा भार वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत औषधीच मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ‘डाॅक्टर तपासतील, निदान करतील; पण औषधींची व्यवस्था तुम्हीच करा’ अशी अवस्था झाली आहे. 

औषधींच्या चिठ्ठ्या घेऊन रुग्ण, नातेवाईक परिसरातील मेडिकल गाठतात. ११७७ खाटांच्या घाटी रुग्णालयात प्रत्यक्षात १६०० ते १७०० रुग्ण भरती असतात, तर बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी २ हजार रुग्ण येतात. त्यामुळे दररोज किमान ४ हजार रुग्णांना औषधी द्यावी लागतात.

इतरांकडून घेतली ७५ लाखांची औषधेघाटी रुग्णालयातील औषधी कोंडी दूर करण्यासाठी धुळे, जालन्यासह अन्य जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांकडून काही दिवसांत सुमारे ७५ लाखांची औषधी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही परिस्थिती राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांची असून आपल्याकडे नसलेली महत्त्वाची औषधे इतर जिल्ह्यातून उसनवारीवर घेतली जातात. 

औषधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. काही जिल्हा रुग्णालयांकडून औषधी घेण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार औषधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखांचे पॅकेज देण्यात येत आहे. त्यातून औषधीचा प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. - डाॅ. संजय राठोड, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

संस्थांचा पुढाकार घाटी रुग्णालयात औषधे मिळत नसल्याने रुग्णांना अतिरीक्त पैसे खर्च करून बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. रुग्णांची ही नित्याची गरज पाहता रुग्णालयाच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुने १५ हून अधिक मेडिकल आहेत. आता काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार