कंधार : जिल्ह्यातील आगाराने पंढरपूर यात्रेसाठी बसेसची सोय भाविक- भक्तासाठी केली होती. परंतु कंधार आगाराने २५ बसेसद्वारे ३० लाख ६ हजार ७३४ चे उत्पन्न मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. तसेच आढावामध्ये सुद्धा बाजी मारली. त्यामुळे नांदेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत यथोचित गौरव केला. त्यामुळे कर्मचारी भारावून गेले. कंधार आगाराने अनेक समस्यांवर मात करण्याचा जणू संकल्प केला आहे. अशा बाबी समोर येत आहेत. पंढरपूर यात्रेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगाराने भाविक-भक्तांची सोय करण्यासाठी विशेष काळजी घेतली होती.कंधार आगाराने मागील वर्षी या कालावधीत ६९ बसेसचा ३० लाख २८ हजारांचे उत्पन्न मिळविले होते. यावर्षी २५ लाख ५९ हजार कि.मी. प्रवासातून तेवढ्याच बससंख्येवर ६ कोटी ७१ लाख ७४ हजार उत्पन्न मिळविले. ३ लाख कि.मी. प्रवास वाढला अन् १ कोटी ४१ लाख ४६ हजारांची वाढ झाली आणि नांदेड विभागातील प्रथम क्रमांक पटकावला. यात कर्मचाऱ्यांचे परिश्रम व आगारप्रमुख के.व्ही. कऱ्हाळे यांचे नियोजन होते. त्यामुळे विभाग नियंत्रक बी. डब्ल्यू. घुले यांच्या अध्यक्षतेखाली यंत्र अभियंता (चालन) एस.एफ. पाटील, कर्मचारी वर्ग, अधिकारी मरदोडे, सहा. कार्यशळा अधीक्षक कारामुंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार येथे एस.जी. केंद्रे, डी.एम. कंधारे, एम.जे. तेलंग, एम.के. मुस्तापुरे, आर.जी. जाधव, पी.जी. घुगे आदी चालक वाहक आदींचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी भास्कर गिते, दीपक शेंडगे आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)कंधार आगार जिल्ह्यात प्रथमकंधार आगाराने २५ बसेसची त्यासाठी व्यवस्था केली होती. या बसेस ९४ हजार ५५२ कि.मी. प्रवास केला आणि ३० लाख ६ हजार ७३४ रु.चे उत्पन्न मिळवले. मागील वर्षी २५ बसेसनी ६० हजार ६०० कि.मी. प्रवासातून १६ लाख १४ हजार एवढे व १३ लाख ९२ हजार ६६४ रुपयांचा फरक पडला. त्यामुळे कंधारने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. नांदेड आगाराने ४७ गाड्याचा वापर करत ३० लाख २ हजार उत्पन्न मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.१ एप्रिल २०१४ ते २० जुलै २०१४ या कालावधीचा आढावा घेण्यात आला.
कंधार आगारास ३० लाखांचे उत्पन्न
By admin | Updated: July 28, 2014 00:59 IST