शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
3
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
4
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
5
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
6
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
7
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
8
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
9
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
10
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
11
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
12
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
13
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
14
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
15
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
16
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
17
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
18
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
19
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
20
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!

यंदा शहरात ३ लाख ४० हजार पुस्तके येणार

By admin | Updated: May 26, 2014 00:46 IST

नांदेड : शहरातील २६३ शाळांतील ८४ हजार ८४५ विद्यार्थ्यांसाठी ३ लाख ४० हजार पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे़

 नांदेड : शहरातील २६३ शाळांतील ८४ हजार ८४५ विद्यार्थ्यांसाठी ३ लाख ४० हजार पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली आहे़ सर्व माध्यमांची पुस्तके लवकरच उपलब्ध होणार होणार असून शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जून रोजी ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत़ शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश, नवे दप्तर आणि नव्या पुस्तकांचा सुंगध सर्वांच्याच आठवणीचा एक भाग आहे़ शाळेत पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येत असल्यामुळे यंदाही या पुस्तकांची प्रतीक्षा विद्यार्थी करत आहेत़ महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा व महापालिकेच्या १७ शाळेत पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे़ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसोबतच स्वाध्यायपुस्तिकाही देण्यात येणार आहे़ २०१४- १५ साठी माध्यमनिहाय पुस्तकाची मागणी करण्यात आली आहे़ इयत्ता पहिली- मराठी माध्यमासाठी ६ हजार ८०७, उर्दूसाठी ४ हजार ३१८, हिंदी २२४, इयत्ता दुसरी -मराठी माध्यमासाठी ६ हजार ४७७, उर्दू ३ हजार ८९४, हिंदी २२९, तिसरी- मराठी माध्यमासाठी ६ हजार १९५, उर्दू ३ हजार ७२३, हिंदी २२१, चौथी - मराठी माध्यम ६ हजार २४५, उर्दू ३ हजार २१८, हिंदी १९४, पाचवी- मराठी माध्यम ७ हजार ५८५, उर्दू ३ हजार ३१०, हिंदी २३०, इंग्रजी १२३, सहावी - मराठी माध्यम ७ हजार २६१, उर्दु ३ हजार ५,हिंदी २३०, इंग्रजी १०२, सातवी - मराठी माध्यम ७ हजार ३५०, उर्दू २ हजार ९४५, हिंदी २२६, इंग्रजी १०५, आठवी - ७ हजार ४८४, उर्दू २ हजार ६२३, हिंदी २१०, इंग्रजी ३११ असा एकूण ८४ हजार ८४५ पाठ्यपुस्तकांचा संच मागविण्यात आला आहे़ यासंदर्भात मनपाचे शिक्षणाधिकारी भागवत जोशी म्हणाले, या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडे ८४ हजार ८४५ विद्यार्थ्यांसाठी तेवढ्याच पुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात आली आहे़ महापालिकेच्या १७ शाळांतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशीच वाटप करण्यात येतील़ या आठवड्यात ही पुस्तके नांदेड शहरात येण्याची शक्यता आहे़ त्यानंतर या पुस्तकांचे शाळानिहाय वाटप करण्यात येईल़ खाजगी अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करता यावे, यासाठी नियोजन करण्यात येत आहे़(प्रतिनिधी) इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी माध्यमांसाठी ५५ हजार ४०४ पुस्तकांचा संच, उर्दू माध्यमासाठी २७ हजार ३६, हिंदी माध्यमासाठी १ हजार ७६४ व इंग्रजी माध्यमासाठी ६४१ पुस्तकांचा संच मागविण्यात आला आहे़ शहरातील २६३ खाजगी अनुदानित, जिल्हा परिषद व महापालिका शाळेत इयत्ता पहिलीत ११ हजार ३४९, दुसरीत १० हजार ६००, तीसरीत १० हजार १३९, चौथी ९ हजार ६५७, पाचवी ११ हजार २४८, सहावी १० हजार ५९८, सातवी १० हजार ६२६, आठवीत १० हजार ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ शहरातील ७५ विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थी वगळता एकूण ८४ हजार ८४५विद्यार्थ्याना पुस्तके वाटप होणार आहेत़