शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मराठवाड्याने मोडला यंदा टँकरचा रेकॉर्ड

By admin | Updated: May 17, 2016 00:34 IST

औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील

३,६५० टँकर : ५६ लाख लोकांची पाण्यासाठी वणवण औरंगाबाद : मराठवाडा विभागातील २,७१६ गावे आणि ९६० वाड्यांना ३,६५० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. विभागात ५६ लाख १६ हजार ६६६ ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याासाठी वणवण करावी लागते आहे. गेल्या वर्षी मेअखेरपर्यंत ३ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा गेला होता. यावर्षी मेअखेरपर्यंत ४ हजार टँकरचा आकडा जाण्याची शक्यता आहे. विभागात १५ मेअखेर औरंगाबाद जिल्ह्यात ६१६ गावे व २३ वाड्यांसाठी ८३२ टँकरद्वारे, जालन्यात ४६६ गावे आणि ७४ वाड्यांसाठी ५४८ टँकर, परभणीत १९१ गावे ४७ वाड्यांसाठी २५० टँकर, हिंगोलीत ३९ गावे एका वाडीसाठी ४१ टँकर, नांदेडमध्ये १९९ गावे १४३ वाड्यांसाठी ३३१ टँकर, बीडमध्ये ७१० गावे आणि ६०४ वाड्यांसाठी ९१० टँकर, लातूरमध्ये २३५ गावे ५२ वाड्यांसाठी ३२३ टँकर, तर उस्मानाबादमध्ये २६० गावे आणि १६ वाड्यांसाठी ४१५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. मागील आठवड्यात २,६१५ गावे आणि ९४९ वाड्यांना ३,४९५ टँकरद्वारे पाणी पुरविले जात होते. ४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात १३ मेपर्यंत ४१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील १८७ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात आली आहे. ९४ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. १२३ प्रकरणांत चौकशी सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ६४, जालन्यात ४३, परभणी ३९, हिंगोली २६, नांदेड ६२, बीडमध्ये ७५, लातूर ५५, उस्मानाबादमध्ये ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.