परभणी: जिल्ह्यात अडीच महिन्यानंतर सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी लावली. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत १ टक्का वाढ झाली आहे.यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाने हुलकानी दिल्यामुळे तब्बल सव्वालाख हेक्टरवरील पेरणी रखडली. अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. अंदाजे ४ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. सोमवारी पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुकानिहाय पडलेला पाऊस असा- परभणी १८.९० मि.मी., पालम १४ मि.मी., पूर्णा ३२.६० मि.मी., गंगाखेड ११ मि.मी., सोनपेठ १० मि.मी., सेलू १५.६० मि.मी., पाथरी २५ मि.मी., जिंतूर ५६.३३ मि.मी. व मानवत १५.६७ मि.मी. असा एकूण २२.१२ मि.मी. पावसाची नोंद झाली़ आतापर्यंत जिल्ह्यात १८५.९२ मि.मी.पाऊस झाला. (वार्ताहर)
येलदरी धरणाच्या जलसाठ्यात वाढ
By admin | Updated: August 26, 2014 23:54 IST