शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीवर सुसाईड नोट लिहून बारावीच्या विद्यार्थ्याने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 22:24 IST

 नैराशातून केली आत्महत्या

अंबाजोगाई : ‘आयुष्यात मी चांगला व्यक्ती बनण्याचा खूप प्रयत्न केला, पण नेहमीच मी अयशस्वी ठरलो’ असे भिंतीवर लिहून अंबाजोगाईतील बारावीच्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी योगेश्वरी नगरी भागात उघडकीस आली.  गुरुप्रसाद रामप्रसाद घाडगे (वय १८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरुप्रसादचे वडील अंबाजोगाई येथीलच एका शाळेत शिक्षक आहेत. गुरुप्रसादच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाल्यामुळे घरात फक्त तो आणि त्याचे आई-वडीलच असतात. हे कुटुंब योगेश्वरी नगरीमध्ये ‘शरयू’ इमारतीमध्ये राहते. गुरुप्रसाद सध्या योगेश्वरी महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिकत होता. मागील काही दिवसापासून तो सतत अभ्यासाच्या तणावाखाली होता. बुधवारी तो नियमितपणे महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जाऊन घरी परतला. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याची आई तब्येत ठीक नसल्यामुळे रुग्णालयात गेली होती आणि वडील शाळेत होते. दुपारी ४ वाजताच्या नंतर गुरुप्रसादने अभ्यासाच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. त्यानंतर भिंतीवर आई-वडिलांसाठी संदेश लिहून ठेवत त्याने दोरीच्या साह्याने छताला गळफास घेतला.

सायंकाळी ७ वाजता आई-वडील घरी परतले. अनेकदा आवाज देऊनही गुरुप्रसाद दरवाजा उघडत नसल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि समोरचे दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून गुरुप्रसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेमुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून अभ्यासाच्या ताणापायी कोवळ्या वयाच्या गुरुप्रसादने जीवन संपविल्याच्या घटनेमुळे सर्वजण स्तब्ध झाले आहेत.  ‘आय क्विट..’ :“या जगात राहणे आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी अधिक अवघड असते. मी नेहमीच एक चांगला व्यक्ती बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी मी अयशस्वी ठरलो. मॉम, दड.. मी तुमचा चांगला मुलगा होऊ शकलो नाही, मला माफ करा. या परिस्थितीत मी जगू शकत नाही. आय क्विट.. (मी निरोप घेत आहे)” अशा आशयाचा संदेश गुरुप्रसादने आत्महत्येपूर्वी भिंतीवर इंग्रजीत लिहून ठेवला आहे. या संदेशातून तो किती तणावाखाली होता हे स्पष्टपणे जाणवत आहे.