परभणी : जगात भारताची बुद्धाचा देश म्हणून ओळख कायम असून, जगातील देशांनी बुद्धाच्या धम्माची ओळख निर्माण केली आहे़ समाज परिवर्तनासाठी उपासकाने सांघिक प्रयत्न करणे गरजेचे असून, वर्षावासाच्या काळात बुद्धाचे ज्ञान व धम्म ग्रहण करणे आवश्यक आहे़, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी केले़ पूर्णा येथे बुद्धविहारात वर्षावास आरंभ कार्यक्रमात ते बोलत होते़ कार्यक्रमास भदंत पैय्यारत्न, भदंत धम्मशील, भदंत संघप्रिय, उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, प्रकाश कांबळे, नगरसेवक मधुकर गायकवाड, देवराव खंदारे, डॉ़ सिद्धार्थ जोंधळे, यादवराव भवरे, एऩ डब्ल्यू़ गायकवाड, महानंद गायकवाड, पी़जी़ रणवीर, दिलीप गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती़ भदंत उपगुप्त महाथेरो म्हणाले, बुद्धाच्या काळात सर्व प्रथम बुद्धाचा धम्म ग्रहण करण्यासाठी ब्राह्मण क्षेत्रीय भिक्षू झाले़ आज श्रीलंका, थायलंड, कोरीया, म्यानमार, जपान या राष्ट्राची बौद्ध राष्ट्रे म्हणून ओळख आहे़ या देशात भिक्षूचा आदर व सन्मान केला जातो, तेथे धम्माची आचारसंहिता, विनय, शिस्त, आदर, दानाचे महत्त्व ओळखून आचरण केले जाते़ प्रत्येक कुटूंबातून एक भिक्षू निर्माण झाला पाहिजे, असे ते म्हणाल़े़ कार्यक्रमास विशाल काळे, कल्पेश दांडगे या दोन विद्यार्थ्यांना भदंत महाथेरो यांच्या हस्ते कायमस्वरुपी श्रामनेर दीक्षा देण्यात आली़ थायलंड, म्यानमार देशाचा दौरा केलेल्या यशवंत उबारे, किशनराव ढोके, सुमित्राबाई ढोके, यांचाही सत्कार करण्यात आला़ यशस्वीतेसाठी निरंजना महिला मंडळ, सुशीलाबाई गायकवाड, शोभाबाई कांबळे, शोभाबाई गायकवाड, त्र्यंबक कांबळे, कौशल्याबाई साळवे, पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले़
उपासकाने बुद्धाचे ज्ञान व धम्म ग्रहण करणे आवश्यक- उपगुप्त महाथेरो
By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST