शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

चिंताजनक ! गलोगल्लीतील टाईमपास कट्ट्यावरील कॅरम, लुडो, पत्ते कोरोनाचे कॅरिअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:25 IST

कंटेन्मेंट झोनमुळे गल्ल्या पोलीस यंत्रणेने बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे एरव्ही गल्लीबोळांतून होणारी पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही.

ठळक मुद्दे सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडवीत बसते अनेकांची मैफलकम्युनिटी स्पिरिट राहिले तरच निभाव

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर कडकडीत बंद पाळला जात असला तरी दाट लोकवस्तीत टाईमपास म्हणून गल्लीत उत्तररात्रीपर्यंत कॅरम, लुडो, पत्त्यांची मैफल बसते आहे.  सोशल डिस्टन्सिंंगचा बोजवारा उडवीत कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असल्यामुळे कॅरम, लुडो, पत्ते कोरोनाचे कॅरिअर झाले आहेत. 

कंटेन्मेंट झोनमुळे गल्ल्या पोलीस यंत्रणेने बंद करून टाकल्या आहेत. त्यामुळे एरव्ही गल्लीबोळांतून होणारी पोलिसांची रात्रीची गस्त होत नाही. परिणामी दिवसभर गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे, सोशल डिस्टन्सिंंग न ठेवता गप्पांचा फड रंगण्यासारखे प्रकार गुंठेवारी वसाहतींसह दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात दिसून येत आहे. प्रशासन कम्युनिटी पोलिसिंग करण्यासाठी नागरिकांना सोबत येण्याचे आवाहन करीत असून, त्याला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. 

संजयनगरप्रमाणेच म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर येथे गल्लोगल्लीत नागरिक कुठलेही सोशल डिस्टन्सिंंग न पाळता कॅरम, लुडो, खेळत असल्याचे दिसून येत आहे. अद्याप त्या भागात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही; परंतु सोशल डिस्टन्सिंंग पाळले गेले नाही तर या भागातदेखील कोरोना हातपाय पसरू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रशासन, पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन या भागातील नागरिकांना समज देणे आवश्यक आहे. संजयनगर, रामनगर येथील कोरोनाग्रस्तांचे नातेवाईक मूर्तिजापूरमध्ये राहतात. त्यांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही, याची काळजी नागरिक आणि प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कम्युनिटी स्पिरिट राहिले तरच निभावकोरोनावर विजय मिळवायचा असेल, तर कम्युनिटी स्पिरिट महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात गर्दी, सोशल डिस्टन्सिंंग, बाहेरचे नागरिक येताना विचारपूस केली जाते. चार लोक उभे राहिले, तर गावाकडे त्यांना घरात जाण्यासाठी सांगण्यात येत आहे. तसे वातावरण शहरात दिसून येत नाही. प्रशासन जागृत राहा, काळजी घ्या, पोलिसिंग करण्यापलीकडे काय करणार, नागरिकांनी स्वत:हून टवाळखोरांना रोखले पाहिजे. स्वयंसेवक, कम्युनिटी पोलीस म्हणून पुढे येत प्रशासनाला मदत केली पाहिजे. कोरोनाचा प्रसार होईल, असे कृत्य जे करीत असतील त्यांना रोखले पाहिजे. कम्युनिटी स्पिरिट राहिले तरच शहराचा निभाव लागेल, असे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले.

दोन पोलीस ठाणे हद्दीत प्रसार झपाट्यानेमुकुंदवाडी आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. त्यामुळे पोलिसांना कार्यक्षमता वाढवावी लागणार आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पुंडलिकनगर, विद्यानगर, न्यायनगर, एन-४ मध्ये रुग्ण आढळून आले आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी हद्दीत रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद