शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चिंता ! ग्रामीण भागाचा कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:00 IST

वैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ जून ते १४ जून दरम्यान शहर क्षेत्रात रुग्णांची पॉझिटीव्हीटी टक्केवारी ०.४५ टक्के व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी ४.२७ टक्के आहे.

ठळक मुद्देचाचणी न करता दुकाने सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाईस्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार

औरंगाबाद : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर कमी होत नसल्यामुळे स्तर तीनवरून एकपर्यंत जाण्यास यंत्रणेला परिश्रम घ्यावे लागणार आहेत. स्तर उंचावत नसल्यामुळे ग्रामीण भागातील लॉकडाऊन सध्या ‘जैसे थे’ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे सांगून व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून यंत्रणांनी चाचणी मोहीम सक्रियपणे राबविण्याच्या सूचना बुधवारी एका बैठकीत दिल्या.

ग्रामीण भागातील संसर्गाचे प्रमाण कमी करून शहराप्रमाणे जिल्ह्याचा ग्रामीण भागही स्तर एकमध्ये आणण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. गावामध्ये सर्व व्यापारी, दुकानदार, विक्रेते, धार्मिक विधी करणाऱ्यांसह सर्वांच्या चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवावे. जेणेकरून ग्रामीणचा बाधित दर कमी होण्यास मदत होईल. ब्रेक दी चेन अंतर्गत सध्या शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळांव्यतिरिक्त सर्व बाबी खुल्या केल्या आहेत.

यापुढे १०० टक्के चाचणी करणाऱ्या व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांचा गौरव करावा. लस घेतलेल्यांना चाचण्यांमधून सूट द्यावी. लस घेतलेल्यांमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करणे बंधनकारक आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भाग स्तर तीनमधून स्तर एकमध्ये आणता येईल. या उद्देशाने सर्व यंत्रणांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केेले.

जिल्ह्यात १०.८० टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्णवैद्यकीय अहवालाच्या आधारे ११ जून ते १४ जून दरम्यान शहर क्षेत्रात रुग्णांची पॉझिटीव्हीटी टक्केवारी ०.४५ टक्के व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी ४.२७ टक्के आहे. कोरोना रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड १०.८० टक्के आहेत.

रविवारपर्यंत चाचणीसाठी डेडलाईनव्यापारी मालक, कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी, विनाचाचणी कोणत्याही दुकानदाराला, व्यापाऱ्याला व्यवसाय, विक्री करता येणार नाही. यासाठी सर्व संबंधितांनी येत्या रविवारच्या आत चाचण्या करणे बंधनकारक आहे. विना चाचण्या दुकान उघडणाऱ्यांवर स्थानिक यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दुकान सील करावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद