शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

औरंगाबादच्या साहित्य क्षेत्रातही डोकावतेय ‘विश्व मराठी परिषद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:09 IST

प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये वाढलेले राजकारण सामान्य वाचकांना आणि नवोदित लेखकांना त्यांच्या परिघात फिरकूही देत नाही.

ठळक मुद्देऔरंगाबादेतही या परिषदेची सभासद नोंदणी सुरू झाली आहे.  विश्व मराठी परिषदेची वेगवान वाटचाल सुरू झाली आहे

औरंगाबाद : जगभरात असणाऱ्या मराठी वाचकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने आणि मराठीच्या विकासासाठी व समृद्धीसाठी नवीन तंत्रज्ञान स्वीकारत नव्या युगात नव्या पिढीला सोबत घेऊन काम करण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषद साहित्य क्षेत्रात डोकावू पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्रात विश्व मराठी परिषद वेगाने वाढत असून, औरंगाबादेतही या परिषदेची सभासद नोंदणी सुरू झाली आहे. 

मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या प्रस्थापित साहित्य संस्थांमध्ये वाढलेले राजकारण सामान्य वाचकांना आणि नवोदित लेखकांना त्यांच्या परिघात फिरकूही देत नाही. अशा राजकारणाने व्यापलेल्या या संस्था त्यांच्याच विश्वात गुरफटलेल्या असून, त्यांच्या उपक्रमांनाही साचेबद्ध स्वरूप आले आहे. असे असताना नव्या वाचकांनी, नवलेखकांनी व्यक्तव्हायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ज्येष्ठ प्रकाशक अनिल कुलकर्णी आणि साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पटकु ले यांच्या पुढाकाराने या साहित्य संस्थेची निर्मिती झाली आहे.तंत्रज्ञानाच्या साह्याने जगभरातील मराठी बांधवांमध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, भावनिक सेतू तयार करणे, त्यांच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग चेतवणे आणि त्यातून भावी पिढीसाठी समृद्ध वारसा तयार करणे, हे विश्व मराठी परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रस्थापित साहित्य संस्था नेमक्या जेथे मागे पडत आहेत, तोच धागा पकडत विश्व मराठी परिषदेची वेगवान वाटचाल सुरू झाली आहे, अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे. 

तंत्रज्ञानाची कास धरून नव्या पिढीला जोडणारऔरंगाबाद शहरातही अनेक नवे लेखक या संस्थेसोबत जोडले जात आहेत. ही संस्था पूर्णपणे काळानुसार पावले टाकणारी आहे. सध्या सर्वांनाच सोयीस्कर ठरणाऱ्या आॅनलाईन माध्यमातूनही व्यक्त होण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. यामुळे आजची मराठी तरुणाईही प्रामुख्याने या संस्थेसोबत जोडली जाईल. संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली की महाविद्यालयापासूनच उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये महाविद्यालयांमध्ये ‘ब्लॉग रायटिंग’विषयी विशेष कार्यशाळा घेण्यात येईल. मराठी पुस्तके कींडल, ई- बुक, आॅडिओ बुक या नव्या माध्यमात प्रकाशित करण्याचाही परिषदेचा मानस असून यासाठी नवलेखकांना सर्वतोपरी संस्थेतर्फे मदत करण्यात येईल. - प्रा. डॉ. वृंदा देशपांडे-जोशी, औरंगाबाद प्रतिनिधी, मराठी विश्व परिषद

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद