शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शहर निघाले जागतिक वारसा स्थळांकडे; डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तूभोवतालची अतिक्रमणे काढण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:51 IST

शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा. युनेस्कोद्वारे ते मानांकन शहराला मिळावे. यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत सोमवारी प्राथमिक आढावा बैठक झाली.

ठळक मुद्देबैठकीअंती डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. सर्व ऐतिहासिक वास्तूंची यादी पालिका १ नोव्हेंबरपर्यंत देणार आहे. त्यानंतर पुढील कामाला वेग येईल. 

औरंगाबाद : शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा. युनेस्कोद्वारे ते मानांकन शहराला मिळावे. यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत सोमवारी प्राथमिक आढावा बैठक झाली. बैठकीअंती डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. 

शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरूनच येथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि विकासाला निधी उपलब्ध होईल. शिवाय शहराचा पर्यटन निर्देशांक वाढेल. विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जागतिक वारसा स्थळांत औरंगाबाद शहराचा समावेश व्हावा, यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्याच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा केली. मनपा हद्दीमध्ये बीबीका मकबरा, औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. १४२ ऐतिहासिक स्थळे शहरात आहेत. १२ ठिकाणे राज्य पुरातत्व विभागाकडे आहेत. तर काही ठिकाणे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहेत. 

ऐतिहासिक स्थळांलगत असलेली अतिक्रमणे, स्मार्ट सिटीचा होणारा फायदा, संवर्धनासाठी असलेले बजेट, ऐतिहासिक वास्तूंची सद्य:स्थिती काय आहे. देखभाल कोण व कशी करीत आहे. येथील सांस्कृतिक मूल्ये कशी आहेत. जीवनशैली, इतिहासातील महत्त्व याचा अहवाल युनेस्कोकडे पाठविण्यासाठी चांगल्या प्रेझेंटेशनची तयारी करावी लागणार आहे. अतिक्रमणमुक्त ऐतिहासिक वास्तू असल्याचे अहवालात नमूद करावे लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समिती शहरात पाहणी करील. समितीने समाधानकारक अहवाल दिला तर शहर जयपूरप्रमाणे ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा होईल. जयपूरचा अहवाल तीन दशकांत सहा वेळा गेला, तेव्हा कुठे यावर्षी त्या शहराला ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले. सोमवारी प्राथमिक चर्चा केली असून, सर्व ऐतिहासिक वास्तूंची यादी पालिका १ नोव्हेंबरपर्यंत देणार आहे. त्यानंतर पुढील कामाला वेग येईल. 

अतिक्रमण डिसेंबरपर्यंत काढा डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तूसभोवतालचे अतिक्रमण काढण्याचे आदेश डॉ.भापकर यांनी सोमवारी बैठकीत दिले. बैठकीला उपायुक्त वर्षा ठाकूर, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, मनपा उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग, नगररचना विभागाचे सहायक संचालक पी. एल. आलूरकर, एमटीडीसीचे अभियंता योगेश राणे, सहसंचालक अजित खंदारे यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादtourismपर्यटन