शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

world book day : विद्यापीठात आहे अजिंठ्याची कलाकृती जगभरात नेणारा ग्रंथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 19:46 IST

द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह- टेम्पल ऑफ अजंता हे पुस्तक विद्यापीठातील ग्रंथालयाचा समृद्ध वारसा आहे 

- राम शिनगारे 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय म्हणजे दुर्मिळ ग्रंथांचा खजिनाच. या ग्रंथालयात १० व्या शतकापासून ते आजपर्यंतची दुर्मिळ, महत्त्वाची ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ब्रिटिश चित्रकार जॉन ग्रिफिथ यांनी अजिंठा या जगप्रसिद्ध कलाकृतीची पेंटिंग, डिझाईन ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ या ग्रंथात चितारली आहे. हा ग्रंथ दोन खंडात १८९६ आणि ९७ साली ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आला. जगात मूळ प्रत उपलब्ध असलेल्या एकूण ३ ग्रंथांतील एक प्रत विद्यापीठातील ग्रंथ संग्रहात उपलब्ध आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांनंतर तत्कालीन हैदराबाद राज्याचे उद्योगमंत्री राजे शामराज राजरायन बहादूर यांनी स्वत:च्या ग्रंथालयातील अतिदुर्मिळ ४५ हजार ग्रंथ या ग्रंथालयाला भेट दिले. यातील बहुतांश ग्रंथ हे जागतिक दर्जाचे आहेत. या गं्रथांमध्ये ब्रिटिश कलाकार जॉन ग्रिफिथ यांच्या ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ ग्रंथाचा समावेश आहे. दोन खंडात असलेला हा ग्रंथ ड्रॉइंग शीटच्या आकाराचा आहे. एका हातात बसणार नाही, असा हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.

या ग्रंथात ग्रिफिथ यांनी अजिंठा येथील प्रत्येक लेण्यात असलेल्या पेंटिंग रेखाटल्या आहेत. ज्या पेंटिंग सद्य:स्थितीत अजिंठा येथे अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्या पेंटिंगचा या ग्रंथात समावेश आहे. तसेच या ग्रंथात प्रत्येक लेणीचा आराखडा, पाणीपुरवठ्याचा नकाशा, लेणीच्या विविध आकाराचे नकाशेही रेखाटण्यात आले आहेत. हा ग्रंथ ब्रिटनमध्ये १८९६-९७ साली प्रकाशित झाला. या प्रकाशनाच्या मूळ ग्रंथापैकी जगात तीनच प्रती अस्तित्वात असल्याची माहिती ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांनी दिली. यातील एक प्रत विद्यापीठाकडे आहे. या प्रतीचे संगणकीकरण करून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा ग्रंथ विद्यापीठ ग्रंथालयाचे  ‘अ‍ॅसेट’ असल्याचे डॉ. वीर यांनी स्पष्ट केले.

दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाविद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेले ४५ हजार ग्रंथ आहेत. यात १६०० ते १८५० या कालखंडातील ३४१४ अतिदुर्मिळ ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या ७ लाख ५३६ पानांचे संगणकीकरण करून स्कॅन करण्यात आले आहे. या दुर्मिळ ग्रंथांमध्ये भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तींसह घटना समिती सदस्यांच्या स्वाक्षरी असलेली मूळ प्रत आहे. याशिवाय प्रिन्सेस अ‍ॅण्ड चीफस् आॅफ इंडिया, गिल्मसेस आॅफ निजाम डोमिनियन्स, रूबयत उमर खय्याम अशा शेकडो ग्रंथांचा समावेश असल्याचे सहायक ग्रंथपाल सतीश पदमे यांनी सांगितले.

ऐतिहासिक पोथींच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंगविद्यापीठाच्या ग्रंथालयात ३५०० पेक्षा अधिक ऐतिहासिक पोथ्या उपलब्ध आहेत. या पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी स्कॅनिंगची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ग्रंथांचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेल्या ग्रंथांशिवाय तब्बल ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ई-बुक्सची संख्याही ३० लाखांपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश ग्रंथांचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे ग्रंथ नष्ट होण्याचा धोका पूर्णपणे संपला आहे.-डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल, विद्यापीठ

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादworld book dayजागतिक पुस्तक दिनAurangabadऔरंगाबाद