सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. ही कामे पुर्ण करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याची स्थिती आहे. तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे. महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत. मराठवाडा- विदर्भाला जोडणारा तालुक्यातील सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ मराठवाडा विकास निधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती; परंतु या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्या एजन्सीने काम बंद केले. तब्बल पाच वर्ष काम रखडत पडल्याने दोन्ही पुलाच्या कामांना वाढीव दराने निधी मिळत नसल्याने एजन्सीने कामच सोडून दिल्याने पुलाच्या कामाची दैना झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या दोन्ही पुलाची रखडलेली कामे पुर्ण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला; परंतु सा.बं. विभागाचे बोटचेपे धोरण व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष यामुळे कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. किमान विधानसभा निवडणुकीपुर्वी तरी पुलाचे काम पुर्ण करा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)सेनगाव तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे मोठ्या प्रमाणात रखडत पडल्याचे दिसत आहे सेनगाव-कनेरगाव नाका या महत्वाच्या राज्य रस्त्यावरील पुलाची कामे तब्बल पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत मराठवाडा- विदर्भाला जोडणार्या सेनगाव- कनेरगाव नाका रस्त्यावर पाच वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सवना गावाजवळ विकासनिधीतून दोन पुलाची कामे हाती घेतली होती साधारणत: पाच वर्षापूर्वी हाती घेण्यात आलेल्या दोन्ही कामांना निधी मिळाला नसल्याने संबंधित काम करणार्या एजन्सीने पुलाचे कामच बंद केले दरवर्षी पावसाळ्यात या दोन्ही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून जाताना वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही ती स्थिती राहण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी करीत आहेत
दोन पुलांची कामे अर्धवट अवस्थेत
By admin | Updated: May 23, 2014 00:24 IST