शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कामे दर्जाची, प्रतीक्षा पावसाची

By admin | Updated: September 2, 2015 23:30 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियनांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण झाली आहेत. डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या अभियनातील कामे योग्य पद्धतीने झाली

बीड : जलयुक्त शिवार अभियनांतर्गत पहिल्या टप्प्यातील कामे पुर्ण झाली आहेत. डिसेंबर २०१५ पासून सुरू झालेल्या अभियनातील कामे योग्य पद्धतीने झाली असून कामाची ‘रिझल्ट’ पाहण्यसाठी आता मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. पहिला टप्पा पुर्ण करण्यासाठी जिल्ह्याला २२ कोटीचा निधी उपलब्ध झाला होता. गावातील शिवार जलयुक्त करण्यासाठी विविध विभागांतर्गत कामांना सुरवात करण्यात आली होती. जिल्ह्यात भूजल पातळी खालावल्याने अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तर सचिव म्हणून जिल्हा कृषी अधिक्षक यांनी काम पाहिले आहे. प्रशासकीय नियोजनानुसार पहिला टप्पा आॅक्टोंबर मध्ये पुर्ण होणार होता. मात्र, पावसाचा कामात व्यत्ययच आला नसल्याने जलयुक्तचे काम अखंडपणे सुरू राहिले परिणामी दोन महिने अगोदरच पहिल्या टप्प्यातील कामे पुर्णत्वाकडे आहेत. यामध्ये २७१ गावांत ३८०३ ऐवढी कामे सुरू होती. पैकी ३५३८ ऐवढी कामे पुर्ण झाली आहेत. यामध्ये कृषी विभागाकडे ३०४२ कामे होती पैकी २९८७ कामे पुर्ण केली आहेत. यामध्ये कृषीविभागाने शेततळे, नविन नाला बंडिंग, जुन्या नाल्यांना उभारी दिली आहे. सर्वाधिक कामे कृषी विभागने पूर्ण केली असून मंजुर निधीपैकी केवळ २० टक्केच निधी खर्ची केला आहे. नविन कामांपेक्षा जुन्या कामांना उभारी दिल्याने कमी खर्चात अधिक कामे झाली आहेत. विविध विभागांतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, नियमीत सलग समतल चर, खोल सलग समतल चर, माती नाला बंडिंग, नाल्यांचे दुरूस्तीकरण, शेततळे अशी १३ प्रकारची कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. नाल्याचे दुरूस्तीकरण व शेतळ्याचा अधिक परिणाम झाला आहे. अभियनाच्या सुरवातीच्या काळात शेततळ्याकरिता जागा देण्यास शेतकरी नकार देत होते. मात्र, कामे पाहून शेतकरीच कामांची मागणी करू लागले आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यास कामांचा परिणाम दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)