शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘सुरक्षेसह काम’; औरंगाबादेत उद्योगांचे अर्थचक्र सुरक्षेसह चालूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:37 IST

उद्योगांमध्ये जवळपास १ लाखांहून अधिक कामगार कामावर परतले आहेत. म्हणजेच याचा अर्थ तेवढ्या कुटुंबांची दैनंदिनी भागण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देकामगारांसाठी घेणार प्रशिक्षण शिबिरेऔद्योगिक संघटनांचा पुढाकार ४० जणांमागे एका व्यक्तीला करणार प्रशिक्षित

औरंगाबाद : औद्योगिक वसाहतीत कोरोनासंसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्यामुळे उद्योग पूर्णपणे बंद ठेवावेत, या दिशेने चर्चा सुरू झालेली आहे; परंतु उद्योग बंद ठेवणे परवडणारे नाही. उद्योगांचे अर्थचक्र सुरक्षेसह सुरूच राहील, यासाठी मंगळवारपासून कामगारांसाठी कंपनीत जाऊन कार्यशाळा घेण्यास सुरुवात करण्यात येत असल्याचे सीआयआयचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

‘सुरक्षेसह काम’ हे धोरण औरंगाबादच्या सर्व उद्योग वर्तुळात राबविण्याबाबत कुलकर्णी यांनी सांगितले, प्रत्येक कंपनीत ४० जणांच्या पाठीमागे एक कामगार प्रशिक्षित करण्यात येणार आहे. सीआयआय याबाबत एक प्रशिक्षणवर्ग आयोजित करीत आहे. कामगार, सुपरवायझर यांना कंपनीत आणि घरी गेल्यावर स्वत:च्या घरासह शेजाऱ्यांबाबत काय काळजी घ्यायची आणि सुरक्षा पाळायची याबाबत जागृत करण्यात येईल. मंगळवारपासून रोज एका ठिकाणी हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. उद्योग संघटना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात पुढाकार घेत असून इतर ठिकाणांपेक्षा उद्योगांनी सर्वाधिक जास्त काळजी घेतली आहे.

आता थांबणे परवडणारे नाहीउद्योगांचे अर्थचक्र थांबणे कुणासाठी परवडणारेच नाही. उद्योगांमध्ये जवळपास १ लाखांहून अधिक कामगार कामावर परतले आहेत. म्हणजेच याचा अर्थ तेवढ्या कुटुंबांची दैनंदिनी भागण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारपेठेतील व्यवसायवृध्दीही वाढली आहे.           इंधनाची दरवाढ होत असल्यामुळे सरकारकडील नियमित रोख कमी पडत असल्याचे दिसते आहे. शिवाय कंपन्या जर बंद ठेवल्या तर कर्ज हप्ते देण्याबाबत अडचणी येतील. त्यामुळे सुरक्षा बाळगून कसे काम करायचे, याबाबत प्रशिक्षण देण्यास सुरुवात करीत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले

जिल्हाधिकारी म्हणाले : औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक कंपनीत घेतली जातेय काळजी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, उद्योग बंद करू शकत नाही. उद्योग व्यवस्थापनाने ठरविले तरच बंदचा निर्णय होईल. याबाबत शासन काही सांगू शकेल. प्रशासन याबाबत सध्या काही सांगू शकत नाही. एखादे छोटे युनिट असेल आणि तेथे २० पैकी १५ लोक पॉझिटिव्ह आले तर ते युनिट बंद ठेवावेच लागेल; परंतु आता उद्योग वर्तुळातील अर्थचक्र रुळावर येत आहे. प्रत्येक कंपनीमध्ये सॅनिटायझर दिले जात आहे, मास्क दिले आहेत. उद्योग वर्तुळात जास्त काळजी घेतली जात आहे. सर्व कंपन्यांतील आवारातही सॅनिटायझेशन केले जात आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्या