शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले

By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST

जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले आहे.

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी संलग्नित महाविद्यालयांचे काही शिक्षक व प्राचार्यांनी जाणीवपूर्वक असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे विद्यापीठ तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या मूल्यांकन केंद्रात उत्तरपत्रिका तपासणीचे काम रेंगाळले आहे. परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार असहकार्याची भूमिका घेणारे शिक्षक व प्राचार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत नोव्हेंबर महिन्यात संलग्नित महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. ‘महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम ७२’ अन्वये कोणत्याही परिस्थितीत परीक्षेच्या शेवटच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी २३ सप्टेंबर रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा प्रक्रिया ही तातडीचे काम समजून संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक व प्राचार्यांनी या कामात टाळाटाळ करू नये.दरम्यान, सद्य:स्थितीत अनेक महाविद्यालयांकडून उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. उत्तरपत्रिका मूल्यांकनाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या शिक्षकांवर प्राचार्यांकडून अन्य कामे सोपविली जात आहेत. त्यामुळे ते उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी शिक्षकांना केंद्रांवर जाणे शक्य होत नाही, अशी माहिती विद्यापीठास दिली जात आहे. जे शिक्षक उत्तरपत्रिका मूल्यांकनाकडे पाठ फिरवीत आहेत. त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांविरुद्ध विद्यापीठामार्फत कडक कारवाई कारवाई करण्याचा निर्णय आता विद्यापीठाने घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रकच विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठविले आहे.