शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 14:07 IST

जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याच्या निर्णयांना आव्हान

ठळक मुद्देग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबच्या निर्णयाला आव्हान पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

औरंगाबाद : १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही विकासाच्या कामांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देऊ नये, असा मनाई हुकूम मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी सोमवारी (दि. ५ मार्च) दिला. याचिकेवर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे.

अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत करण्याच्या आणि विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याबाबत १५ फेब्रुवारी २०१९ रोजी काढलेल्या दोन शासन निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे मनाई हुकूम दिला आहे. वरील दोन परस्परविरोधी शासन निर्णयांना वागबेट ग्रामपंचायतीचे सरपंच अमरनाथ गिते यांनी खंडपीठात आव्हान दिले आहे. त्यांनी राज्य शासन, उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच ग्रामविकासमंत्र्यांना प्रतिवादी केले आहे. वरील दोन्ही तालुक्यांतील सर्वच ग्रामपंचायतींची विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि अ‍ॅड. प्रवीण एस. दिघे, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील लोखंडे काम पाहत आहेत. 

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०१९ रोजी अंबाजोगाई आणि परळी वैजनाथ तालुक्यांमधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासाची कामे मंजूर केली. ग्रामविकास विभागाने त्याच दिवशी (१५ फेब्रुवारी २०१९ रोजी) दोन शासन निर्णय जारी केले. पहिल्या शासन निर्णयानुसार ज्या ग्रामपंचायती विरोधी पक्ष (काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस) प्रणीत आहेत, त्या  ग्रामपंचायतींची विकासकामे उस्मानाबादच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावीत, असे म्हटले होते. अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेनऊ कोटींची ३०० कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. दुसऱ्या शासन निर्णयानुसार सत्ताधारी पक्ष (भाजप-शिवसेना) प्रणीत ग्रामपंचायतींची विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींद्वारे करावीत, असे म्हटले होते, अशा ग्रामपंचायतींची सुमारे साडेसोळा कोटींची ५५० कामे जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली, असा आरोप याचिकेत केला आहे. याचिकाकर्त्याने वरील दोन्ही शासन निर्णयांना आव्हान दिले आहे. 

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठState Governmentराज्य सरकारgram panchayatग्राम पंचायत