जालना : एक लाख लोकसंख्या असलेले शहर कचरामुक्त करण्यासाठी केंद्र शासन सर्व्हेक्षण २०१७ ही मोहीम राबवित आहे. या अभियानात सिद्ध होण्यासाठी नगर पालिका युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहर कचरामुक्त तसेच हागणदारीमुक्त झाल्यास नगर पालिका विशेष निधी मिळण्याचा मार्ग सोपा होणार आहे. गुणांकनावर अधारित ही स्पर्धा असून यात शहरातील स्वच्छता हा मुख्य निकष आहे. या स्पर्धेसाठी यात अंतर्गतच शहर हागणदारीमुक्त झाल्यास शहराला तब्बल दोन कोटींचा निधी मिळू शकतो. ४ जानेवारी २०१७ पासून हे अभियान देशभरात राबविले जात आहे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह, प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय आहे का?, नगर पालिकेकडून सांडपाण्याची व्यवस्था कशी लावली जाते, कचरा विल्हेवाटीसाठी काय उपाययोजना आहे. दररोजचे कचरा संकलन कसे होते आदी विविध विषयांवर केंद्र सरकारचे विशेष पथक तपासणी करणार आहे. सुमारे एक हजार गुणांची ही स्पर्धा असून, जास्तीत जास्त चारशेपेक्षा अधिक गुण मिळविणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर पुन्हा स्वच्छतेची तपासणी करून नगर पालिका स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.
स्वच्छ सर्व्हेक्षणासाठी पालिका कामाला
By admin | Updated: January 6, 2017 00:30 IST