शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

३ हजार विहिरींची कामे रखडली

By admin | Updated: March 26, 2016 00:54 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरींची कामे प्रामुख्याने सुरु करण्यात आली़ यामध्ये ७ हजार ४७५ सिंचन विहिरींना मान्यता देण्यात आली़ त्यातील ३ हजार ८५२ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत़ अद्यापही ३ हजार ६२३ विहिरींची कामे रखडली आहेत़ लातूर जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नाही़ परिणामी जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ पाण्यासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना मैलोमैल पायपीट करावी लागत आहे़ जिल्हा प्रशासनाच्या वतीने टंचाईच्या उपाययोजना म्हणून टँकर व विंधन विहीरींच्या अधिग्रहणाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे़टंचाईत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरींना मोठ्या प्रमाणात मान्यता देण्यात आली़ यामध्ये अहमदपूर तालुक्यात ९५१ विहिरींना मंजुरी दिली असून त्यापैकी ३४१ विहीरींची कामे पूर्ण तर ६१० विहीरींची कामे अद्यापही अपूर्ण आहेत़ तालुकानिहाय रखडलेली कामे अहमदपूर ६१०, औसा - ६६९, चाकूर - ३९९, देवणी - ४६५, जळकोट - २४०, लातूर - २३८, निलंगा -२९८, रेणापूर - २२६, शिरुर अनंतपाळ -१७०, उदगीर - ३०८ अशी ३ हजार ६२३ विहीरींंची कामे रखडली आहेत़