शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवलच! रोबोटने केली गणरायाची आरती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:55 IST

आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे

मयूर देवकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. औरंगाबाद येथील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये गणेशाची आरती एका स्वयंचलित रोबोटद्वारे केली जाते. ६४ कलांची देवता असणाºया गणरायाची अशी आरती पाहून काळ किती पुढे गेला आणि भविष्यात रोबोट काय काय करू शकतो याची कल्पना येते.हाती पंचारती घेऊन गजाननाची आरती करणारा हा रोबोट परिसरात कौतुक आणि औत्सुक्याचा विषय ठरत आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये रोज सकाळी आणि सायंकाळी सर्व कर्मचारी आणि कामगारांच्या उपस्थितीत अशी ‘टेक्नो आरती’ केली जाते.‘माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तंत्रज्ञानामध्ये अफाट प्रगती साधली आहे आणि गणपती ही बुद्धीची देवता आहे. म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून आपण तंत्रज्ञानातूनच गणरायासाठी काहीतरी केले पाहिजे, या हेतूनेच हा उपक्रम साकारण्यात आला आहे, असे कंपनीचे संचालक सुनील किर्दक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आपला बाप्पा नेहमीच प्रत्येकातील ‘क्रिएटिव्हिटी’ बाहेर काढतो. म्हणून तर यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी हटके करायचे या विचारातून ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीतील इंजिनिअर्सनी रोबोटच्या हस्ते आरती करण्याचे ठरवले. कंट्रोलप्रमुख प्रदीप पांडे व कंट्रोल इंजिनिअर शुभम सौरभ यांनी या रोबोटवर काम केले आहे. ते सांगतात, ‘साधारण एक महिन्यापूर्वी सर्व टीम सदस्यांच्या चर्चेतून ही कल्पना समोर आली. वरिष्ठांकडून होकार मिळाल्यानंतर आम्ही काम सुरू केले. सर्वप्रथम तर आरती कशी केली जाते याचा सविस्तर अभ्यास केला. आरतीचे ताट कसे ओवाळले जाते, ओवाळण्याची योग्य पद्धत कोणती, आरतीमधील इतर विधी कोणते, हे आधी समजून घेतले. त्यानुसार मग रोबोटला कोणत्या सूचना द्यायच्या त्याचा आराखडा बनवून प्रोग्राम तयार केला. दैनंदिन कामापेक्षा काहीतरी वेगळे करायला मिळाले याचे खूप समाधान आहे.मग आरतीस किती वेळ लागतो, त्यानुसार ओवाळण्याची क्रिया निश्चित करण्यात आली. सेकंदा-सेकंदाचे आणि इंचा-इंचाचे मोजमाप करून रोबोटच्या हालचालींची आखणी व प्रोग्राम तयार करण्यात आला. आरती सुरू होताच रोबोट आरती ओवाळतो आणि आरती पूर्ण झाल्यावर सर्वांसमोर आरतीचे ताट धरून आरतीदेखील देतो.‘सर्व औद्योगिक कारखाने यंत्रावरच अवलंबून आहेत. मग कंपनीतील गणपतीची आरती यंत्रानेच करावी, जेणेकरून त्यावर बाप्पाची कृपा होईल, अशी या संकल्पनेमागची भूमिका प्लँटप्रमुख शैलेश मुळूक यांनी स्पष्ट केली. हा आरती करणारा रोबोट पाहण्यासाठी वाळूज औद्यागिक वासाहतील इतर कंपन्यांचे कर्मचारी आणि कामगार आवर्जून आरतीला येतात. रोजच्या रटाळ वेळापत्रकातून जरा वेगळे काहीतरी अनुभवण्याची संधी त्यांना यातून मिळते. जग ‘आॅटोमेशन’कडे जात असताना धार्मिक विधीदेखील ‘टेक्नो सॅव्ही’ होणार असे दिसतेय.