शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निधीच नसल्याने औरंगाबादमधील महिला रुग्णालय रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:34 IST

प्रकल्प किंमत (बजेट इस्टिमेट) मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे

ठळक मुद्देराज्य शासनाचे निधीसाठी होत आहे दुर्लक्ष  आरोग्यसेवा आयुक्त म्हणतात, निधी मिळताच कामाला सुरुवात

औरंगाबाद : शहरातील दूध डेअरी येथील जागेत प्रस्तावित शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाची उभारणी रखडणार आहे. निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून, पहिल्या टप्प्यातील निधी मिळताच या रुग्णालयाचे काम सुरू होईल, असे म्हणत राज्याचे आरोग्यसेवा आयुक्त तथा संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनीही राज्य शासनाकडे बोट दाखविले आहे.

डॉ. अनुपकुमार यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सामाजिक न्याय भवन येथे औरंगाबाद आणि लातूर विभागातील आरोग्यसेवेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबर २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली; परंतु जागेअभावी या रुग्णालयाच्या उभारणीला काही केल्या मुहूर्त मिळाला नाही. महिला रुग्णालयाचा प्रारूप आराखडा मंजूर झालेला आहे. प्रकल्प किंमत (बजेट इस्टिमेट) मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे; परंतु अद्याप निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयासाठी नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे. महिला रुग्णालयाविषयी विचारणा केली असताना लवकरच निधी मिळेल आणि काम सुरू होईल, असे डॉ. यादव यांनी सांगितले.  

आढावा बैठकीस अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी आरोग्यसेवेतील लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची डॉ. यादव, डॉ. पाटील यांनी चांगलीच कानउघाडणी केली.

माता व बालविभागाचा अद्याप निर्णय नाहीदूध डेअरीच्या जागेवर महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच परिसरात आता घाटी रुग्णालयाऐवजी २०० खाटांचे स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्याचे नियोजन सुरू आहे; परंतु एकाच ठिकाणी दोन्ही सेवा सुरू झाल्यास रुग्णांची गर्दी होईल. त्यामुळे हा विभाग कुठे उभारायचा यासंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. यासंदर्भात अद्याप काही निर्णय घेतलेला नाही, असेही डॉ. यादव यांनी सांगितले. 

मिनी घाटी जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरूचिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२० पैकी केवळ ८० खाटांद्वारे रुग्णसेवा दिली जात आहे.

टॅग्स :Womenमहिलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलfundsनिधीState Governmentराज्य सरकार