लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : राजाटाकळी गावात दारूबंदीच्या मागणीसाठी गावातील महिलांनी पोलीस चौकीवर धडक मोर्चा काढला.परिसरात दारूची दुकाने वाढल्याने ग्रामस्थांसह तरूणवर्गात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. महाविद्यालयीन तरूणांना व्यसन जडल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. महिलांनी वारंवार पोलिसांना निवेदने देऊन दारूबंदीची मागणी केली. मात्र, याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनी बुधवारी एकत्र येत पोलीस चौकीवर धडक मोर्चा काढून रोष व्यक्त केला. आठवडाभरात गावातील दारूचे दुकान बंद न केल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर दीडशे महिलांच्या स्वाक्षºया आहेत.पोलिसांचे दुर्लक्षयाबाबत अवैध दारूविक्रीकडे पोलिसांचे अभय असल्याचे संतप्त महिलांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी लक्ष देण्याची मागणी अनूसया देवकुळे मालन आर्दड, सरपंच रामेश्वर काळे आदींनी केली आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक टी .टी धुमाळ यांनी काही दिवसांत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दारूबंदीसाठी महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:09 IST