शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिला पालिकेवर धडकल्या

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली.

जालना: अंबड रस्त्यावरील यशोदीप नगरातील संतप्त महिलांनी पिण्याच्या पाण्यासह अन्य मुलभूत सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सोमवारी नगरपालिकेवर धडक मारली. अंबड रस्त्यावरील यशोदीपनगरात ८० ते १०० घरे आहेत. दहा वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास आहेत, परंतु नगरपालिका प्रशासनाने या भागास पिण्याच्या पाण्यासह अन्य कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा पुरविल्या नाहीत. त्यामुळेच संतप्त महिलांनी सोमवारी थेट पालिका कार्यालयावर धडक मारली. सीमा खरात, सुनीता निकाळजे, कमल चव्हाण, कस्तुरा इंगोले, स्वाती वाहुळकर, आशा हिवाळे, मनीषा खिल्लारे, योगीता पवार, अनसूया पवार, डॉ. माधवी देशमुख, अर्चना खाडे, श्रद्धा खाकरे, तारामती शिनगारे, मनीषा साबळे, विद्या देशमुख, नीता देशमुख, रेणुका पाचफुले, नीता टोपे, ज्योती खरात, मालती गोफणे, कांचन हिवाळे, त्रिशाला लबडे, सुमंत अहेर, उर्मिला वळेकर, प्रज्ञा मोरे, अरुणा पवार यांच्यासह शेकडो महिलांनी या कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे या भागात अंतर्गत रस्ते नाहीत. सांडपाण्याची विल्हेवाट लागावी म्हणून नाल्या नाहीत. नळ नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात विद्युत खांब उभारण्यात आले, परंतु त्यास जोडणी नाही, दिवेही नाहीत, अंधारातच ये- जा करावी लागते. पावसाळ्यात तर चिखलमय रस्त्यावरुन कसरती कराव्या लागतात, असे या महिलांनी नमूद केले. मुलांसह आबालवृद्धांचा किमान विचार करुन पालिका प्रशासनाने तात्काळ सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी या महिलांनी केली. महिलांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. (प्रतिनिधी)रुपनगरवासियांचाही ठिय्या अंबड चौफुली भागातील रुप नगर विठ्ठल रुक्मीणी मंदिर परिसरातील संतप्त महिलांनी पालिका कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. सहा वर्षांपासून नळांद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नाही. वसाहतीत नवीन बांधकामे झाली. परंतु आपापल्या सोयीनुसार अनेकांनी कनेकशन करुन घेतले. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणीपुरवठा बंद किंवा विस्कळीत झाला आहे. या संदर्भात नगरसेवकांसह पालिका प्रशासना वारंवार सांगून सुद्धा दखल घेतली नाही. अशी खंत अरुणा टकले, अंबिका शंकरपेल्ली, छाया पाथरकर, कविता ठोंबरे, पद्मा मस्के, सुनीता पाफळ, कीर्ती मोरे, अंजली पालवे, शोभा पालवे, राधा सोळे, वर्षा जाधव, छाया कुलकर्णी, सुवर्णा कुलकर्णी, कौशल्या भालेकर, सुनंदा अवचार, केशरबाई कदम, राधा कोरडे, जयश्री अनिल परदेशी, रेखा गायकवाड, आशा काळे, अलका पाटील, सुरेखा पाथरकर, संगीता जाधव, भारती डोईफोडे, श्रृती शेळके, वर्षा सोनवणे, साक्षी पाटील सोनम पवार, दिश वाघमारे, सुशीला डिघोळे आदींनी केली.प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी निवेदनाद्वारे महिलांनी मागणी केली.