शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

आता महिला सरपंचांच्या पतीची लुडबुड चालणार नाही; ‘पतीराज’ थांबवा, अन्यथा जाऊ शकते पद

By विजय सरवदे | Updated: August 29, 2023 20:16 IST

महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायतींमध्ये अनेक महिला आरक्षणामुळे सरपंचपदावर आरूढ झाल्या, परंतु महिला सरपंचांच्या कारभारात पतींचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. सरकारने हे रोखण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला, तरीही पडद्याआडून पुरुष मंडळीच ग्रामपंचायतींचा कारभार चालवत असल्याचे चित्र दिसत आहे. तथापि, आता तरी सावध व्हा, नाहीतर हा प्रकार अंगलट येऊ शकतो. एखादीही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यास त्यांच्या अहवालानुसार, विभागीय आयुक्त हे संबंधितांचे सरपंचपद रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

महिला सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, महिला सरपंच असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये त्यांचे पतीच कारभार चालविताना दिसतात. विरोधकांकडून यावर आवाजही उठवण्यात आला. आता यापुढे पती किंवा नातेवाइकांनी हस्तक्षेप केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सरपंचपतीची ग्रामपंचायतींमधील लुडबुड बंदवाढता हस्तक्षेप थांबविण्यासाठी सन २००७ मध्येच शासन निर्णय जारी केला होता. त्यानंतर, प्रशासनही अलर्ट मोडवर आले आणि काही प्रमाणात का होईना, सरपंच पती किंवा त्यांच्या नातेवाइकांची ग्रामपंचायतीतील लुडबुड बंद झाली.

...तर होणार कारवाईसरपंचांचे पती किंवा नातेवाइकांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणणे, अथवा संबंधितांच्या खुर्चीत बसणे अथवा गैरवर्तणूक केल्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील ३९ कलमान्वये कारवाई केली जाऊ शकते.

जिल्ह्यात ५६२ महिला सरपंचजिल्ह्यातील नऊ तालुक्यांत ५६२ महिला सरपंच निवडून आल्या आहेत. यापैकी काही सरंपचपतींकडून आजही ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप सुरू आहे.

पदावरून काढण्याची कारवाई ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सरपंचांचे पती अथवा नातेवाईक हस्तक्षेप करत असल्याची तक्रार पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची चौकशी करतात. त्यासंबंधीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर ते कलम ३९ (१) अन्वये पदावरून काढण्याची कारवाई करतात.- ओमप्रकाश रामावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

४) कोणत्या तालुक्यात किती महिला सरपंचतालुका             महिला सरपंचऔरंगाबाद- ५४फुलंब्री- ५२सिल्लोड- ७०सोयगाव- २७कन्नड- ९३खुलताबाद- १८गंगापूर- ७७वैजापूर- १०५पैठण- ६६

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबाद