शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:59 IST

: डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जटवाडा रस्त्यावरील राजनगर येथे उघडकीस आली.

औरंगाबाद : डोक्यात दगड टाकून विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जटवाडा रस्त्यावरील राजनगर येथे आज  दुपारी उघडकीस आली. नग्नावस्थेतील मृतदेहाशेजारी झोपलेल्या चारवर्षीय बालिकेला घरात कोंडून आरोपी पसार झाला. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास चिमुकली रडतच आतून दार वाजवत असल्याने शेजाऱ्यांनी दार उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

कविता ऊर्फ सोनी अशोक जाधव (३३), असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती अशोक जाधव बांधकाम मिस्तरी असून, त्याला दारूचे व्यसन आहे. जाधव दाम्पत्याला दोन मुली आणि मुलगा अशी अपत्ये असून, मोठा मुलगा आणि मुलगी शिक्षणासाठी आंबेडकरनगर येथील कविताच्या आईकडे राहतात. कविता ऊर्फ सोनी ही पती अशोक आणि लहान मुलगी आकांक्षा(४) हिच्यासोबत जटवाडा रस्त्याजवळील राजनगर येथे राहत होती.

अशोक गुरुवारी सकाळी कामावर गेला होता. त्यानंतर तो दिसून आला नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळपासून कविताच्या घराला बाहेरून कडी लावलेली होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कविताच्या घरातून आकांक्षाचा रडण्याचा आणि दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकू न आरेफा यांनी दार उघडले. त्यावेळी आकांक्षा रडतच बाहेर आली. आरेफा आणि शेजारी राहणाऱ्या घरमालकीण यांना आकांक्षाने रडतच आई घरात असल्याचे सांगितले. त्यांनी कविताच्या घरात डोक ावून पाहिले असता ती नग्नावस्थेत रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. या घटनेची माहिती त्यांनी हर्सूल पोलिसांना कळविली.

उपनिरीक्षक सरला गाडेकर, सहायक उपनिरीक्षक कल्याण चाबूकस्वार, विठ्ठल जवखेडे, गिरी, पोहेकॉ खरात आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी गोधडीवर रक्ताच्या थोराळ्यात नग्नावस्थेत कविताच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्घृण खून केल्याचे पोलिसांना आढळून आले. खून करण्यासाठी वापरलेला दगडही मृतदेहाशेजारी होता. मारेकरी आणि कविता यांच्यात झटापट झाली असावी, असे घटनास्थळी पडलेल्या बांगड्यांच्या तुकड्यांवरून पोलिसांच्या निदर्शनास आले. शिवाय मृतदेहाशेजारी पाच ते सहा अंडी होती. तिचा खून पतीने केला असावा, असा संशय पोलिसांना असून, त्याचा शोध सुरू  आहे.