शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

गावठी पिस्तुलासह महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:33 IST

जुनाबाजार परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांना वाँटेड असलेल्या महिलेस न्यायनगर येथे गावठी पिस्तूलसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. आरोपी महिलेकडून दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जुनाबाजार परिसरात दहा वर्षांपूर्वी झालेल्या तरुणीच्या खूनप्रकरणी पोलिसांना वाँटेड असलेल्या महिलेस न्यायनगर येथे गावठी पिस्तूलसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. आरोपी महिलेकडून दोन जिवंत काडतुसेही पोलिसांनी जप्तकेली.ज्योती कडुबा अहिरे ऊर्फ सायरा शेख असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याविषयी गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, मंगळसूत्र चोरीप्रकरणी मोक्कांतर्गत हर्सूल कारागृहात कैद असलेल्या शहजाद शमीम शेख (रा. आझमगड, उत्तर प्रदेश, ह.मु. औरंगाबाद) आणि आरोपी महिला लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये अनेक वर्षांपासून राहते.२००८ साली सिटीचौक पोलीस ठाण्यात शहजादविरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यात ज्योती ऊर्फ सायरा शेख ही सहआरोपी होती. घटना घडल्यापासून ती पसार झाल्यामुळे ती पोलिसांना सापडत नव्हती. दरम्यान, मूळची पैठण येथील रहिवासी असलेली ज्योती हिने पतीला सोडून दिलेले आहे. ती न्यायनगर येथील एका जणाच्या घरात भाड्याने राहते आणि तिच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक योगेश धोंडे, कर्मचारी संतोष सोनवणे, सुभाष शेवाळे, काकासाहेब पंडित, सतीश हंबरडे,नाना फुंदे, सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, विकास गायकवाड, आनंद वाहूळ, महिला कर्मचारी रेखा चांदे आणि शेख सुलताना यांनी २८ मे रोजी सकाळी न्यायनगर येथे महिलेच्या घरावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी पंचांसमक्ष तिच्या घराची झडती घेतली असता एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली.