शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

महिला डॉक्टरला दाखविला चाकूचा धाक, रस्त्यावरून ओढण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:05 IST

घाटीतील वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणाऱ्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून आणि तोंड दाबून बाजूच्या झुडपात नेण्याचा प्रयत्न दोन जणांनी  केल्याची धक्कादायक घटना  बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. 

औरंगाबाद : देशभरात उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेविषयी संताप व्यक्त होत असतानाच घाटीतील वसतिगृहातून सुपर स्पेशालिटी ब्लॉककडे जाणाऱ्या महिला निवासी डॉक्टरला चाकू दाखवून आणि तोंड दाबून बाजूच्या झुडपात नेण्याचा प्रयत्न दोन जणांनी  केल्याची धक्कादायक घटना  बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. 

मात्र डॉक्टरने आरडाओरड केल्याने त्यांनी तिथून पळ काढला आणि पुढचा अनर्थ टळला. सदरील परिसरातीलजुन्या वार्ड ५ च्या समोर हा प्रकार घडला. त्या डॉक्टर रात्री १२ च्या सुमारास सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये ड्युटीवर जात होत्या. वसतिगृहापासून अवघ्या काही मीटरच्या अंतरावर येताच पाठीमागून दोन तरूणांनी त्यांना चाकू दाखवून अडविले. डॉक्टरांचे तोंड दाबून बाजूला झुडपात ओढण्यात प्रयत्न केला. मात्र डॉक्टरने केलेले आरडाओरडा त्या दोघांना पळून जाण्यास भाग पाडणारा ठरला. 

घाबरलेल्या डॉक्टर महिलेने धावतच सुपर स्पेशालिटी ब्लॉक गाठले. तेथील सुरक्षारक्षक, सहकारी आणि वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. सुरक्षारक्षकांनी शोधाशोध केली असता आसपास कोणीही आढळले नाही. या घटनेमुळे घाटीत खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा नव्याने ऐरणीवर आला आहे. 

घाटीत रात्री ड्युटीवर जाणाऱ्या निवासी महिला डॉक्टरांसोबत आणि ड्युटी संपवून पुन्हा वसतिगृहात जाणाऱ्या महिला डॉक्टरांसोबत यापुढे  सुरक्षारक्षक सोबत जाणार आहेत, असा निर्णय अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुधीर चौधरी, डॉ. वर्षा रोटे, डॉ. विकास राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या परिसरात वाढलेली झाडे- झुडपे हटविण्याचे काम गुरूवारी हाती घेण्यात आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाhospitalहॉस्पिटल