औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील घटना
फुलंब्री : औरंगाबादवरून फुलंब्रीकडे दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा दुचाकीवरील तोल गेल्याने तिच्या बाजूने जाणाऱ्या हायवाच्या मागील टायरखाली आल्याने ती ठार झाली. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सावंगी गावाजवळ घडली. प्रीती विश्वास पाटील (३५, रा. उल्कानगरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रीती पाटील या दुपारी औरंगाबादवरून फुलंब्रीकडे स्कुटी (क्र. एमएच २० डीपी ६७३०) वरून जात होत्या. दरम्यान तीन वाजेच्या सुमारास त्या सावंगी गावाजवळ आल्या. तेव्हा जवळून जाणाऱ्या हायवा (क्र. एमएच २० डीई ७५५०) च्या मागील टायरखाली त्यांचा तोल गेल्याने त्या पडल्या. यात त्यांना जबर मार लागला. नागरिकांनी त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सदरील अपघात औरंगाबाद-जळगाव महामार्गावर झाला. या अपघाताची एमएलसी फुलंब्री पोलिसांना पाठविण्यात आली. परंतु अपघात फुलंब्री की सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला याबाबत संभ्रम आहे.
270621\img-20210627-wa0134 (2).jpg
अपघातग्रस्त कार