शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकाऱ्याविना जलआयुक्तालय कागदावरच

By admin | Updated: May 3, 2017 03:24 IST

औरंगाबादेतील वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन) येथे संपूर्ण राज्यासाठी मृद व जलसंधारण आयुक्तालय १ मे रोजी सुरूकरण्याची घोषणा

विकास राऊत  / औरंगाबादऔरंगाबादेतील वाल्मी (जल व भूमी व्यवस्थापन) येथे संपूर्ण राज्यासाठी मृद व जलसंधारण आयुक्तालय १ मे रोजी सुरूकरण्याची घोषणा आयएएस अधिकारी न मिळाल्यामुळे हवेत विरली. आता आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर त्या आयुक्तालयाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा होणार आहे. मृद व जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्तपदावर भारतीय प्रशासन सेवेतील (अधिकालिक वेतनश्रेणीत) अधिकारी नेमण्याचा निर्णय झाला खरा परंतु अधिकाऱ्याची नेमणूक अद्याप होऊ शकलेली नाही. जल व भू-व्यवस्थापन (वाल्मी) ही जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील प्रशिक्षण संस्था तिच्या स्वायत्ततेला बाधा न आणता मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करून या विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.राज्य मंत्रिमंडळाने २५ एप्रिल रोजी घेतलेल्या बैठकीत मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादेत स्थापन करण्यास मान्यता दिली. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेच्या परिसरात हे आयुक्तालय १ मेपासून सुरूकरण्याचे देखील जाहीर करून टाकले. जलसंधारण विभागाचे नाव बदलून ते मृद व जलसंधारण विभाग केले. जिल्हा परिषदेचा सिंचन विभागही त्या आयुक्तालयात वर्ग होणार आहे. २० अभियंते त्या आयुक्तालयात वर्ग होतील, असे सांगण्यात येत आहे.लवकरच उद्घाटनजलसंधारणमंत्री राम शिंदे लोकमतला माहिती देताना सांगितले, की आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे १ मे चा मुहूर्त हुकला. नवीन तारीख ठरलेली नाही; परंतु लवकरच आयुक्तालयाचे उद्घाटन होईल.