शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयआरएफ’च्या मूल्यांकनात विद्यापीठ शंभरच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:13 IST

विद्यापीठ गटात देशात ८५ वा क्रमांक

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत जाहीर केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’मधील (एनआयआरएफ) विद्यापीठ गटात विद्यापीठाने मोठी झेप घेत ८५ वा क्रमांक पटकावला. मागील वर्षी विद्यापीठाचा समावेश १०१ ते १५० यात झालेला होता. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१६ पासून देशभरातील शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनासाठी ‘एनआयआरएफ’ संकल्पना अस्तित्वात आणली. यात सर्व शैक्षणिक संस्थांची एकत्रित यादी जाहीर केली जाते. यानंतर विद्यापीठ, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, विधि, महाविद्यालय, व्यवस्थापनशास्त्र, वास्तुशास्त्र आणि वैद्यकीय गटातील संस्थांची स्वतंत्र यादी जाहीर केली जाते. विद्यापीठ गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ८५ वा क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास विद्यापीठातर्फे डॉ. गुलाब खेडकर उपस्थित होते. 

शैक्षणिक संस्थांमध्ये १०० च्या बाहेरडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला विद्यापीठ या गटात देशात ८५ वा क्रमांक मिळाला असताना देशातील शैक्षणिक संस्था गटात मात्र १०१ ते १५० या गटात स्थान मिळाले आहे. पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थात राज्य विद्यापीठातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १७ वा क्रमांक पटकावला, तर मुंबई विद्यापीठाला १०१ ते १५० या गटातच स्थान मिळाले. इतर विद्यापीठांचा या गटातही समावेश नाही.

विद्यापीठाने ‘एनआयआरएफ’मध्ये मोठी मजल मारली आहे. नामांकित विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ खूप पुढे आहे. मराठवाड्यातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमुळेच ही रँकिंग मिळाली आहे. - डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र