शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

विनर्स, कुंटे स्पोर्टस् संघात विजेतेपदाची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:29 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे एन-२ स्टेडियमवर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनर्स संघाने साई अकॅडमीवर आणि कुंटे स्पोर्टस्ने युनिव्हर्सल संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. स्फोटक अर्धशतकी खेळी करणारे श्रीनिवास कुलकर्णी व विश्वास वाघुले हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले. उद्या, शनिवारी या दोन संघांत सकाळी ८ वाजता एडीसीए स्टेडियमवर विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.

ठळक मुद्देआज रंगणार फायनल : श्रीनिवास कुलकर्णी, विश्वास वाघुले सामनावीर

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे एन-२ स्टेडियमवर झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विनर्स संघाने साई अकॅडमीवर आणि कुंटे स्पोर्टस्ने युनिव्हर्सल संघावर मात करीत अंतिम फेरीत धडक मारली. स्फोटक अर्धशतकी खेळी करणारे श्रीनिवास कुलकर्णी व विश्वास वाघुले हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले. उद्या, शनिवारी या दोन संघांत सकाळी ८ वाजता एडीसीए स्टेडियमवर विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात विनर्स संघाविरुद्ध साई अकॅडमीने प्रथम फलंदाजी करीत ३0 षटकांत ९ बाद १४४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून श्रीहर्ष पाटीलने ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या. दानिश पटेलने ४ चौकारांसह ३६ व अभिषेक भुमेने २५ धावांचे योगदान दिले. विनर्सकडून करण लव्हेरा, शशिकांत पवार व हरमितसिंग रागी यांनी प्रत्येकी २, तर हिमांशू मुकिंदने १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात श्रीनिवास कुलकर्णीच्या १0 चौकारांसह ५८ चेंडूंत फटकावलेल्या नाबाद ५८ धावांच्या बळावर विनर्स संघाने विजयी लक्ष्य २६.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. श्रीनिवासला हरमितसिंग रागीने २३, करण लव्हेराने १९ व श्रेयस गांगुर्डेने १४ धावा काढीत साथ दिली. साई अकॅडमीकडून ओमकार गुंजाळने २, तर श्रीहर्ष पाटील व कार्तिक बालय्या यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विश्वास वाघुले याने १0 चौकारांसह फटकावलेल्या ६७ धावांच्या बळावर कुंटे स्पोर्टस्ने ३0 षटकांत ८ बाद १७६ धावा फटकावल्या. ऋषिकेश नायरने १६ चेंडूंत २ षटकार व एका चौकारासह २४ व आदित्य कराडखेडेने ११ धावा केल्या. युनिव्हर्सलकडून सचिन पिसे याने ३, तर ओमकार ठाकूरने २ गडी बाद केले. रोहित नाईक व कल्पेश सवाई यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनिव्हर्सल स्पोर्टस् २१.२ षटकांत ९५ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून रोहित नाईकने २0, विवेक विश्वकर्माने १९, विक्रम चौधरीने १२ व अंबादास होकेने ११ धावा केल्या. फलंदाजीत अर्धशतक ठोकणाºया विश्वास वाघुलेने गोलंदाजीतही चमक दाखवताना १८ धावांत ४ गडी बाद केले. सागर सपकाळ व अक्षय खरात यांनी प्रत्येकी २, तर आदित्य कराडखेडे याने १ गडी बाद केला.उद्या सकाळी विजयी संघात अंतिम फेरीचा सामना खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामना व बक्षीस वितरण समारंभास जास्तीत जास्त खेळाडू व क्रिकेट रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे अध्यक्ष राम भोगले, उपाध्यक्ष पारस छाजेड, नरेंद्र पाटील, सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर व कोषाध्यक्ष सुभाष पटेल यांनी केले आहे.