शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे पर्व संपले; चुरशीच्या लढतीत जलील यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:08 IST

विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

औरंगाबाद : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या औरंगाबाद मतदारसंघातील चौरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडी - एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली होती. मात्र, शेवटी जलील यांनी विजय खेचून आणला. 

मतमोजणीत अगदी सुरुवातीपासूनच जलील यांनी आघाडी राखली. विशेष म्हणजे १७ व्या फेरीपर्यंत लढत जलील आणि जाधव अशीच राहिली, खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले तर झांबड शेवटपर्यंत चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ व्या फेरीनंतर खैरे यांची मते वाढत गेली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले. तर २१ व्या फेरीअखेर खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत जलील यांच्यावर ७०० मतांची आघाडी घेतली. कधी खैरे पुढे तर कधी जलील असे होत शेवटच्या पाच फेऱ्या अगदी T२० सामन्यांसारख्या झाल्या. शेवटच्या दोन फेऱ्यात जलील यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. या विजयासह औरंगाबादमधील खैरे यांचे मागील चार टर्मपासून सुरु पर्व संपले

मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.  यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली. कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. तर  वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन वेगळा प्रयोग केला. तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी उडी घेत आणखी चुरस वाढवली. विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मतदारसंघः औरंगाबादविजयी उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 388373

पराभूत उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 383186

पराभूत उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 282547

पराभूत उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः 91401

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019