शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला ४० गावांतील वीजपुरवठा

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

औराद शहाजानी : परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्या आहेत. १४० पोल पडल्याने ४० गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. शिवाय, पंडित वीरभद्रजी आर्य विद्यालयातील सात वर्ग खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत.औराद शहाजानी, हलगरा, तगरखेडा, माळेगाव, वांजरखेडा, सावरी, शेळगी, कोटमाळसह अन्य गावांत शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वारा व पाऊस झाला. या वादळात जुन्या औराद गावातील जवळपास ११० लोकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहेत. तसेच पोलही उन्मळून पडले आहेत. लातूर-बीदर रोडवरील फर्टिलायझर्स, सिमेंट व हॉटेल आदी दुकानांवरील पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसात चार व्यापाऱ्यांचे सिमेंट व खत पावसाने भिजले आहे. औराद शहाजानीत रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावातील काही भागांत वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. हलगरा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर रात्री वीज कोसळली. यामुळे त्या उपकेंद्राअंतर्गत असलेल्या सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील वर्षी ६ व ७ जून रोजी औराद परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्षभरापूर्वी पोल उन्मळून पडले होते. ते पडलेले पोल अद्यापही त्याच अवस्थेत आहेत. महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तेरणा नदीकाठावरील अनेक पोल उन्मळून पडलेले असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांची ओरड आहे. गुरुवारी झालेल्या वादळी वारा व पावसात अनेकांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)काम सुरू आहे...विस्कळीत झालेला विद्युतपुरवठा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. पोलही उन्मळून पडले आहेत. तुटलेल्या तारा जोडणीचे काम सुरू असल्याचे कनिष्ठ अभियंता एस.बी. डोंगरे यांनी सांगितले. मागील वर्षी वादळात पडलेले पोल उभे करण्याचे काम सुरु असल्याचेही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़