शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्याने शहरात अनेक भागांत वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:11 IST

दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देधुळीचे लोट : विद्युत वाहिन्या तुटल्या, दूध डेअरी चौकात वाहतूक नियंत्रक दिव्यांचा खांब कोसळला

औरंगाबाद : दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला. वाºयाचा वेग इतका होता की, दूध डेअरी चौकातील वाहतूक नियंत्रक दिव्यांचा खांब कोसळला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.शहरात दिवसभरात ४१.४ अंश उन्हाच्या तडाख्यानंतर सायंकाळी ७ वाजेनंतर अचानक बदल होऊन वातावरण आल्हाददायक झाले. उकाड्याने त्रस्त नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला; परंतु जोरदार वाºयाने नागरिकांसह महावितरणचे अधिकारी-कर्मचारी चांगलेच हैराण झाले. वाºयामुळे चिकलठाणा एमआयडीसीतील इंडो जर्मन टुल येथील ३३ केव्ही लाईन तुटली. त्यामुळे रात्री ८ वाजेच्या सुमारास एन-५ येथील गुलमोहर कॉलनी व परिसर, एन-६ आविष्कार कॉलनी, शुभश्री कॉलनी, संभाजी कॉलनी, मथुरानगर, सिडको एन-७, एन-८ यासह सिडको-हडकोतील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.याशिवाय रेल्वेस्टेशन येथेही ३३ केव्हीची लाईन तुटल्याने रेल्वेस्टेशन भागातील वसाहतींसह सातारा-देवळाई परिसर अंधारात बुडाला. याबरोबरच समर्थनगर, औरंगपुरा, पुंडलिकनगर, श्रीकृष्णनगरसह विविध भागांतील वीज गुल झाली.उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत करण्याचे कामरात्री दहा वाजेपर्यंत अनेक भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला, तर काही भागांत अंधार कायम होता. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत होते. वाºयामुळे सर्वत्र धूळच धूळ उडत होती. वाºयाने दूध डेअरी चौकातील ट्रॅफिक सिग्नलचा खांब कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रस्त्यावर खांब पडल्याने काही वेळेसाठी जालना रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली; परंतु पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत जोरदार वारे वाहत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज