नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे २ जून रोजी दुपारी ४ वाजता वादळीवार्यासह जवळपास अर्धातास पाऊस पडला. वार्याने झाड पडून एक बल्ौ दगावल्याची घटना घडली आहे. बाभळीच्या झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर वादळाने झाड पडल्याने तो बैल जागीच मरण पावला असल्याची माहिती नर्सी पोलिस ठाण्यात शे. कदीर शे. रसूल यांनी दिली. त्या बैलाची बाजारात किंमत ४५ हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी एस. एच. खंदारे, तलाठी इनामदार, कासम यांची उपस्थिती होती. कनेरगाव नाका : परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाने नुकसान होऊन सोमवारचा बाजार पूर्ण विस्कळीत झाला. दरम्यान, आकाशात कडकडाट होऊन विजा चकमत होत्या. पावसामुळे परिसरातून आलेल्या ग्रामस्थ व शेतकर्यांची बाजार खरेदी राहिली. व्यापार्यांनी आपापली दुकाने पावसामुळे गुंडाळली. तसेच दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या मोटारी बंद आहेत.(प्रतिनिधी)
वादळी वार्याने झाड पडून बैैल दगावला
By admin | Updated: June 4, 2014 00:46 IST