शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:25 IST

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे.

विकास राऊतऔरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पदभार स्वीकारला. औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प तरतुदींसह यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आपल्या योजनांचे स्पष्टीकरण केले. औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जावे, यासाठी भरीव तरतूद केंद्र शासनाकडून मिळेल, या दिशेने प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कशा वाढतील, यात सर्वाधिक लक्ष घालणार आहे. डीएमआयसीसाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, उद्योग यावेत, येथील उपलब्ध सुविधांचे जगभर मार्केटिंग करण्यासाठी विशेष एजन्सी असावी, याबाबत उद्योग खात्याशी बोलून चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा दिसेल औरंगाबाद-पुणे या महामार्गाचे रुंदीकरण करणे, तसेच औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला गती मिळेल, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करेन. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा सर्व बाजूने यावा, असाच माझा प्रयत्न राहील.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री 

 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAurangabadऔरंगाबाद