शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणाने अत्याचार थांबतील का? युवक महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थिनीचा सवाल

By राम शिनगारे | Updated: October 5, 2023 19:17 IST

आरक्षणामुळे महिलांचा संसदेत टक्का वाढेल

छत्रपती संभाजीनगर : महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मणिपूर, हैदराबाद, दिल्लीसह इतर ठिकाणी सतत महिलांवर होणारे अत्याचार थांबतील का, असा सवाल वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनीने उपस्थित केला. तर काहींनी महिलांना मंदिरात पुजारी, चर्चमध्ये फादर, मशिदीत मौलाना बनता येणार नाही, पण आरक्षणामुळे संसदेत पंतप्रधान बनता येईल, असेही सांगितले.

विद्यापीठातील युवा महोत्सवात शब्दरंग स्टेजवर दुपारनंतर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महिला आरक्षण, हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि चंद्रावर पोहोचलो, आता पुढे काय? हे तीन विषय देण्यात आले होते. त्यात सर्वाधिक मत महिला आरक्षणांवरच विद्यार्थिनीनी मांडले. एका विद्यार्थिनीने बोलताना महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवले आहे. प्रत्येक ठिकाणी महिला सक्षमपणे काम करीत आहेत. देशाची राष्ट्रपती महिला आहे. पंतप्रधान महिला बनल्या आहेत. या आरक्षणामुळे महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळेल, असे सांगितले. एका विद्यार्थिनीने सांगितले की, महाराष्ट्रात एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्क्यांची सूट दिली. म्हणून महिला फिरू लागल्या आहेत. यामुळे त्यांना व्यवहारासह इतर गोष्टीही समजू लागल्या आहेत. लोकसभा, विधानसभेतील आरक्षणामुळे महिलांचा विकासच होणार असल्याचे सांगितले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्वातंत्र्यानंतरच महिलांना समान हक्क देण्यासाठी हिंदू कोड बिल आणले. ते मंजूर न झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा उल्लेखही एका विद्यार्थ्याने केला.

पाश्चात्य गायनाचे सूर निनादलेउद्घाटनानंतर सृजनरंग मंचावर पाश्चात्य समूह गायन, सुगम गायनाचे सूर उमटले. या प्रकारात अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवित पाश्चात्य गाण्यांचे वाद्यांवर सादरीकरण केले. ललितरंग रंगमंचावर दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रालाच प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर व्यंगचित्रकला व कोलाज या स्पर्धाही याच मंचावर घेण्यात आल्या. नादरंग रंगमंचावर शास्त्रीय तालवाद्यांचे सादरीकरण विविध संघांनी केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद