शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'मराठवाड्याचा तेलंगणमध्ये समावेश करण्याची मागणी तेलंगण सरकारकडे करणार'

By बापू सोळुंके | Updated: May 12, 2023 20:47 IST

रमेश केरे पाटील भेटणार तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना, १४ मेपासून संवाद यात्रा 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण, सारथीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी वसतिगृह, अरबी समुद्रातील शिवस्मारक आदींचे प्रलंबित प्रश्नाकडे शासन दुलर्क्ष करीत आहे. राज्य सरकार जर मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगण राज्यात करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्य समन्वय रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणे, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला, परंतु याची अंमलबजावणी नाही. मराठा आरक्षणाचे भविष्य काय आहे, याचे उत्तर राज्यसरकारकडे नाही.मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या राजकीय समन्वयकांना हाताशी धरून राज्यसरकार समाजाची दिशाभूल करण्याचे काम राज्यसरकार करीत असल्याचा आरोपही केरे पाटील यांनी केला.  स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा म्हणजे आताच्या तेलंगण राज्याचा भाग होता. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण राज्यसरकार देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगणमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी लवकरच तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार आहे. १४ मेपासून संवाद यात्रा काढणारराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आजही आपला विश्वास आहे. त्यांनी समाजाच्या मागण्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी आहे. मात्र ते जर राजकीय समन्वयकांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करीत असतील तर ती शुद्ध फसवणूक आहे. ही बाब जनतेला सांगण्यासाठी १४ मेपासून मराठवाड्यात संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा