शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसपुढे युतीचे आव्हान टिकणार का?

By admin | Updated: June 17, 2014 00:52 IST

अनुराग पोवळे, नांदेड एकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने घट्ट पकड निर्माण केली आहे़

अनुराग पोवळे, नांदेडएकेकाळी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने घट्ट पकड निर्माण केली आहे़ लाटेच्या चर्चेतही नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य देत उत्तर विधानसभा मतदारसंघाने आपली पकड कायम ठेवली़ सेनेच्या मुळ कार्यकर्त्यांनी पुन्हा सेनेची वाट धरून विस्कटलेली घडी सुधारण्याचा प्रयत्न चालवला आहे़ दरम्यान, एमआयएम आणि संविधान पार्टीचे उमेदवारही आता मैदानात राहणार असल्याने येणारी लढत रंगतदार होईल़ तर २००९ च्या निवडणूक काळात अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते़ त्याचा परिणाम जिल्ह्यासह उत्तर विधानसभा मतदारसंघावरही जाणवला़ राजकारणातील नवखे परंतु शिक्षण क्षेत्रातील चेहरा असणारे डी़पी़ सावंत विजयी झाले़ सावंत यांच्याकडेच पुढे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही आले़ परिणामी उत्तर मतदार संघातील विकासकामांना निधी कमी पडला नाही़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला तब्बल ४३ हजार १५४ इतके मताधिक्य मिळाले़ दुसरीकडे या मतदारसंघात शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ नांदेडमधील शिवसेना ही अंतर्गत गटबाजीने पोखरलेली आहे, हे उघड गुपीत आहे़ या मतदारसंघातही सेनेचे संघटन पूर्णत: कोलमडले आहे़ काही दिवसांपूर्वी सेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांची घोषणा मातोश्रीवरून करण्यात आली़ या दोन नेत्यांच्या नावाचे स्वागत शिवसेनेतून कमी अन काँग्रेसमधून अधिक झाले़ मूळचे शिवसेनेचेच असलेले प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी मध्यंतरी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता़ काँग्रेसकडून दोन वेळेस ते नगरसेवक म्हणून निवडून आले़ पांढरे यांनीही नांदेड उत्तर मतदारसंघातून उमेदवारीची तयारी केली आहे़ पांढरे यांची संघटनशक्ती शहरी भागात मजबूत असली तरी ग्रामीण भागात त्यांना पोहोचावे लागणार आहे़ हिंगोली लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही उत्तरमधून विधानसभा लढविण्यासाठी पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्याची चर्चा आहे़ २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही वानखेडे यांनी नांदेड उत्तरमधून तयारी केली होती़ त्यामुळे आता शिवसेनेत तिकिटासाठी मोठी स्पर्धा असेल़ खुद्द जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचीही निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे़ तर मनसेचे इंजिन घेवून धावण्यास जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार हेही सज्ज झाले आहेत़एमआयएम आणि संविधान पार्टी हे दोन पक्ष नांदेडमध्ये एकत्र आहेत़ नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या भागात या पक्षाचे तीन नगरसेवक आहेत़ नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून या पक्षांचे उमेदवार रिंगणात राहणार आहेत़ त्यात नांदेड उत्तरमधून संविधान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी तयारी सुरू केली आहे़ गायकवाड यांचे दलित चळवळीतील स्थान आणि मिळत असलेली एमआयएमची साथ हा महत्त्वाचा मुद्दा असेल़ त्यामुळे काँग्रेससह, शिवसेना व एमआयएम-संविधान, मनसे अशी चौरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत़काँग्रेसडी़पी़ सावंत  ६७०५२शिवसेनाअनुसया खेडकर  २२९७० अपक्ष डॉ़शीला कदम  १३४०८इच्छुकांचे नाव पक्षडी़पी़ सावंत काँग्रेस सुधाकर पांढरे  शिवसेनासुभाष वानखेडे  शिवसेनासुरेश गायकवाड  संविधान-एमआयएमलोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण (कॉंग्रेस) यांना ४३१५४ एवढे मताधिक्य